प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाचे केंद्रस्तरावर दोन दिवसीय बाल रक्षक प्रशिक्षण SCERT Maharashtra सूचना.

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार बालरक्षक सक्षमीकरण केंद्र स्तर प्रशिक्षणाबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. 


बालरक्षक सक्षमीकरण ऑनलाईन कार्यशाळेचे राज्यस्तरावरून आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रत्येक जिल्हयातून २-तज्ञ (समता विभाग प्रमुख व जिल्हा समन्वयक बालरक्षक) उपस्थित होते.

त्यानंतर तालुका स्तरीय ३ तज्ञ व्यक्तीना दोन दिवस प्रत्यक्ष (Face to Face) हे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर देण्यात आलेले होते. जिल्हा स्तरावर सद्यस्थितीत बालरक्षक सक्षमीकरण केंद्र स्तरीय प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. त्या अनुषंगाने केंद्र स्तरीय बालरक्षक दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करण्यात यावे. जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ञ बालरक्षकांनी केंद्रस्तरावर सदर प्रशिक्षण द्यावयाचे आहे. यानुसार तालुका निहाय केंद्रस्तर प्रशिक्षणाचे नियोजन करावे. प्रत्येक शाळेतून एका शिक्षकास केंद्रस्तरावर प्रशिक्षण देण्यात यावे. या दोन दिवसीय केंद्रस्तर प्रशिक्षणासाठी प्रस्तुत कार्यालयाकडून बालरक्षक घटक संच पुरविण्यात येणार आहे. सदर संच आपल्या मार्फत केंद्र स्तरावरील प्रशिक्षणार्थिना पुरविण्यात यावा.

केंद्र स्तरीय बालरक्षक प्रशिक्षणासाठी सोबतच्या निधी वितरण तक्त्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांना PFMS प्रणाली द्वारे जिल्यातील केंद्र सख्येनुसार प्रती केंद्र रु. ७४०/- प्रमाणे निधी वितरीत करण्यात येत आहे.


निधी विनियोगाबाबत सूचना पुढील प्रमाणे :

१ सदर उपक्रमाचा खर्च शासनाच्या वित्तीय नियमावली मधील तरतुदीनुसार करण्यात यावा.

२ उपक्रमाच्या प्रशिक्षणार्थ्यांची माहिती, नाव, पद, मोबाईल क्रमांक इत्यादीसह उपलब्ध असावी. ३ सदर निधी चहापान साधन व्यक्तींचा प्रवासभत्ता यावर खर्च करावा. 

केंद्र प्रशिक्षणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या कडे दिली आहे. 

संख्येप्रमाणे रक्कम संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना Withdrawl Limit PFMS प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आलेली आहे.


५ केंद्रस्तरावर प्रशिक्षणामध्ये उपस्थिती पत्रकामध्ये प्रशिक्षणार्थीचे पूर्ण नाय, पदनाम, कार्यालय मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी दिनांक-निहाय उपस्थितीची स्वाक्षरी इत्यादी बाबींचा समावेश असावा, ६. केंद्रस्तरावरील प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती पत्रक, उपक्रमाची निवडक छायाचित्रे व २ ते ४ मिनिटांची ध्वनीचित्रफीत) इत्यादी साहित्याचे संकलन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात यावे, या उपक्रमासाठी नियुक्त नोडल अधिकारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी सर्व अभिलेखांची एक लिंक तयार करून या कार्यालयास oquitydept@maa.ac.in वर ई- मेल करावी.

१७. प्रशिक्षण खर्च, अभिलेखे भविष्यकालीन लेखापरीक्षणासाठी आपल्या स्तरावर जतन करून ठेवण्यात यावेत.

८. केंद्रस्तरावरील प्रशिक्षण निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने संकलित करून जिल्हयाचे एकत्रित उपयोगिता प्रमाणपत्र प्रशिक्षण झाल्यानंतर दोन दिवसात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयास पाठवावे, विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.

९. केंद्रस्तरावर प्रशिक्षण २५ फेब्रुवारी २०२४ अखेर पर्यंत पूर्ण करण्यात यावे व दि.२५/०२/२०२४ पर्यंत उपयोगिता प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करावे.


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.