Pavitra Portal Teachers Recruitment Tait 2022 New Update - पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना, दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणान्या जाहिरातींसाठी एसईबीसी इमाव या प्रवर्गातील आरक्षण बाबत आदेश.

पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणान्या जाहिरातींसाठी एसईबीसी/इमाव या प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभ तसेच १० टक्के रिक्त पदांकरीता कार्यवाही करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शिक्षण आयुक्त यांना निर्देश. 


१. बिंदुनामावलीतील त्रुटींबायत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करणेबाबत मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. याअनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून विदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रूटी नसल्याबाबत शहानिशा करुन १० टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दूसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त १० टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा.

२. भरतीप्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरतीप्रक्रियेचा एक भाग आहे. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात. तसेच शासन निर्णय दि.१०.११.२०२२ अन्वये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहीराती घेण्यात येतील, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

३. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दि.२६.०२.२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्रांद्वारे वेळोवळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन, नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरीता विहीत आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देणेबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात.

४. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी, २०२२ अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेले उमेदवारांना सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरीता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे. यास्तव सदर उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहीरातीमध्ये प्राप्त होणारे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ च्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबतची माहिती उमेदवारांनी नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चूकीमूळे उमेदवारांना त्यांनी अर्हता प्राप्त करुनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही. यास्तव दि.१२.०२.२०२३ पूर्वी विहीत अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहीरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरीता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची ची संधी संधी देण्यात देण्यात यावी.


कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन




दिनांक ०१/०३/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


१. पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्या संदर्भात उमेदवार, त्यांचे पालक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही अशा उमेदवारांनीसुद्धा या प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. त्या सर्वांचे प्रशासन आभारी आहे.


२. इतःपर कोणाची पदभरती संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठित केली आहे व त्या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


३. संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठित केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमांवरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे, तक्रार निवारण समितीकडील अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे. प्रशासकीय मुद्द्यांबाबत समाज माध्यमांमधून अनाठायी शंका उपस्थित करणे अथवा अन्यप्रकारे अडथळे निर्माण करणे यातून कालापव्यय होऊन पुढील प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचेही नमूद करण्यात येत आहे.


४. वरील बाबींमधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी (Conversion Round) पूर्वतयारी करीत असून त्याबाबतदेखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरातलवकर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित आहे. यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.


५. वरील प्रमाणे जास्तीतजास्त उमेदवार विदाऊट इंटरव्यू या टप्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे.


 दिनांक २९/०२/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


प्राधान्यक्रमाबाबत : प्राधान्यक्रम भरण्यावर कोणतीच मर्यादा नव्हती २०० हून अधिक सुद्धा प्रेफरन्स भरलेले आहेत. प्राधान्यक्रम कसे भरायचे याच्या स्पष्ट सूचना प्रेफरन्स भरण्यापूर्वीच दि ५ फेब्रुवारी २०२४ म्हणजेच प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी दिलेल्या आहेत. त्यामुळे गुण व अर्हता याचा मेळ घालूनच निवड यादी तयार झाली आहे.

टीईटी बाबत : TET ही अर्हता परीक्षा आहे हे सर्वश्रुत आहे आणि मूळ जाहिरातीत नमूद आहे. अर्हता परीक्षेत सवलत घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही, ही बाब सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णित केली आहेच परंतु महाराष्ट्र शासनाच्या सर्व निवड प्रक्रियांमध्ये अनुसरण्याची कार्यपद्धती आहे. कोणत्याही विभागाची यादी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होईल.

आरक्षित प्रवर्गाबाबतः आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ न घेतलेले खुल्यातून आणि लाभ घेतलेले आरक्षित कोट्यातून असे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियोग्यताधारक निवडले गेले आहेत. निवड यादी पाहता एकूण भरतीत मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांची संख्या दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गावर अन्याय झाला आहे, ही बाब वस्तुस्थितीला अजिबात धरून नाही.

खुल्या प्रवर्गाबाबत : या प्रवर्गात ज्या व्यक्तींचा समावेश होणे कायदेशीर अनुज्ञेय आहे त्या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे.

कट ऑफ मार्काबाबतः कट ऑफ मार्क मधील फरकाबाबत आरक्षित प्रवर्गातील सवलतींचा लाभ घेतलेली व्यक्ती त्यांच्या त्यांच्या प्रवर्गात सामावली गेलेली आहे. सवलतीचा लाभ घेतलेले उमेदवार मुळात खुल्या पदावर जाण्यासाठी पात्रच नसतात. त्याठिकाणी आरक्षणाचा लाभ न घेतलेले अथवा मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवार गेलेले असल्याने एखाद्या प्रकरणात कमी अथवा अधिक झालेल्या कट ऑफ ची तुलना करता येणार नाही. अशी बाब अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये होत असते.

बिंदुनामावली बाबत : २०१९ पासून बिंदुनामावल्या अद्ययावत नव्हत्या. त्या सर्व पुरेसा कालावधी देऊन व त्यावेळी प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपाचे खंडन करून मागासवर्ग कक्षाकडून विधिवत प्रमाणित करून घेतलेल्या आहेत. त्यावर पुराव्यानिशी कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नाही, केवळ मोघम आरोप केले जात आहेत. तरीदेखील कोणत्याही शंकेला वाव राहू नये म्हणून १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत.

तक्रार निवारण : सर्व बाबी कायदेशीररित्या बिनचूक केल्यानंतरही जर काही मुद्दे शिल्लक राहत असतील तर त्यांचे निराकरण करण्याकरता संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठित करण्यात आली आहे, या समितीकडे दाद मागणे शक्य आहे.

पेपर फुटी, घोटाळे इत्यादींमध्ये जर्जर झालेल्या विभागात अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया पूर्ण केल्याची भावना निवड न झालेल्या अनेक उमेदवारांनीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली आहे. लवकरच रूपांतरण राऊंड (conversion round) बाबतची प्रक्रियासुद्धा काटेकोरपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वरील प्रमाणे सर्व मुद्द्यांचे निरसन होत असताना काही घटक समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती प्रसारित करून, या प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ही बाब सयुक्तिक नाही.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.