Pavitra Portal Teachers Recruitment 2022 New Updates - दिनांक २६/०२/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

 दिनांक २६/०२/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Notifications.aspx?NotificationCategoryID=18


• पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


• सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियोग्यताधारक यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळविले जाईल त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करावे.


व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होवू नये यास्तव आरक्षणाचे कटऑफ व विषयाचे कटऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरवातीस दर्शविण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झाले आहे.


सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील यासंदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ई-मेलवर विहित नमुन्यात (लवकरच पुरविला जाईल) अर्ज करून त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ त्या ईमेल ऍड्रेस चाच वापर करावा. त्या ईमेल ऍड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. तसेच कोणत्याही अधिका-यांच्या व्यक्तिगत व्हॉटसअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये.


खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कटऑफ खुल्या पेक्षा काही ठिकाणी जास्त आल्या बाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करीत आहेत


या संदर्भात पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्र. ११२५४/२०१९ मधील सिविल अर्ज क्र. ८२५९/२०१९ मध्ये दि. २४/१०/२०१९ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता धारण करण्यामध्ये त्या त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित (खुला) प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत.


केंद्र शासनाच्या दि ०१/०७/१९९८ व दि. ०४/०४/२०१८ च्या ज्ञापनामध्ये देखील अशाप्रकारे सवलतीचा लालाभभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे. राज्यशासनाच्या विविध प्रकारच्या उदा. तलाठी भरती ग्रामविकास विभागाकडील विविध पर्दाच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या त्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरविण्याची तरतूद आहे.या व अन्य प्रचलित तरतुदी विचारात घेण्यात आल्या आहेत. या शिक्षकभरतीसाठी टीईटी ही अर्हता परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाले असेल तर जरी त्यांना टी ए आय टी या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्याय निवाडे व शासनाचे आदेशानुसार त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेलेले आहे. त्यामुळे कट ऑफ मध्ये हा फरक दिसतो परंतु तो पूर्णपणे विधीसंमत आहे.


मराठी, उर्दू वा अन्य माध्यमांमध्ये इ.६ वी ते इ ८ वी / इ ९ वी ते १० वी /इ ११ ते इ १२ वी या गटातील भाषा विषयाच्या अभियोग्यत्ताधारकाची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेतील त्याची पदवी/पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभियोग्यताधारकांची निवड होवू शकते. 

• मराठी, उर्दू वा अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजी साठी अभियोग्यताधारक यांची शिफारस करताना संबंधित अभियोग्यताधारक यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारात घेवून करण्यात आलेली आहे. यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित अभियोग्यताधारकांची निवड होवू शकते.


गुणवत्तेनुसार अभियोग्यताधारक यांचे निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला वा स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उलपब्ध असेल तर अभियोग्यताधारक यांची शिफारस होते त्यामुळे काही विषयांच्या बाबतीत कटऑफ गुण कमी आल्याचे दिसत आहे.


• काही प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असेलेल्या पदांपेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दिसून येत आहे.


• मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभियोग्यताधारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे. समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेवून शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येईल.


• मुलाखतीसह पदभरती पर्याव निवडलेल्या व्यवस्थापनांना मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक ७६२७/२०२३ मधील आदेशानुसार प्रचलित तरतूदी विचारात घेता १:१० या मयदित मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येतील.


वस्तुस्थितीची व्यवस्थीत माहिती न घेता अभियोग्यताधारकांना संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेपार्ह प्रकार या भरतीप्रकिया दरम्यान दिसून आलेला आहे. याचिका करणे हा जरी हक्क असला तरी तत्पूवी कायद्यातील तरतुदींची पडताळणी स्वतः अभियोग्यताधारकानी करावी. सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्याची शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावेत.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.