दिनांक ११/०२/२०२४
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
शंका समाधान -
• इ. ६ वी ते ८ वी व इ ९ वी ते १० वी या गटातील केवळ बी.कॉम. अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवीस्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेवून उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत. बी.कॉम. सह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. उदा. १. बी.कॉम. अर्हतेनंतर एम. कॉम अर्हता धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार इ ११ वी ते १२ वी चे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. २. असा उमेदवार बी.कॉम. अर्हतेसह डी.एड. असेल व टिईटी-१/सिटीईटी- १ असेल तर इ १ ली ते ५ वी चे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.
• इ. ६ वी ते ८ वी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल व सामाजिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवीस्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील.
• काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २८/०३/२००६ नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या २ पेक्षा अधिक (अपवाद दुसऱ्या अपत्याचे वेळी जुळे अथवा तिळे जन्म असल्यास) असल्याने असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाहीत, यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत.
• स्थानिक स्वराज्य संस्था (इ.१ ली ते १२ वी) व खाजगी संस्थातील (इ.१ ली ते ८ वी) पदभरतीसाठी शासन निर्णय दि.०१/०१/२०१९, ०७/०२/२०१९, २५/०२/२०१९, १६/५/२०१९, १२/०६/२०१९, १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेले आहे.
इ.१ ली ते इ ५ वी -इ.१२ मध्ये खुला प्रवर्ग किमान ४५ टक्के / आरक्षित - ४० टक्के
इ.६ वी ते इ ८ वी- पदवीमध्ये खुला प्रवर्ग-किमान ४५ टक्के / आरक्षित ४० टक्के
इ. ९ वी ते १० वी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग- किमान ५० टक्के
इ.११ वी ते १२ वी पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षीत प्रवर्ग किमान ५० टक्के वयोमर्यादा-शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर दिनांक १६/१०/२०२३ रोजी दिली आहे. यास्तव उमेदवाराचे वय दिनांक २३/१०/२०२३ रोजीचे विचारात घेण्यात आले आहे.
• खाजगी संस्थातील रिक्त पदांसाठी इ.९ वी ते १० वी साठी पदवीस्तरावर उत्तीर्ण श्रेणी व इ ११ वी ते १२ वी साठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे, तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही.
• उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवार त्यांच्या सोईनुसार पसंतीक्रम नमूद करुन प्राधान्यक्रम लॉक करणार आहे. तथापि, उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही. तसेच उमेदवार त्यांच्या सोईनुसार प्राधान्यक्रम लॉक करु शकतात.
• उमेदवारास सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोईचे पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास त्यास तो पात्र राहणार आहे.
• उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरच्या प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही.
उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोईचे होणार आहे.
• उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणात नोंद केलेले माहितीनुसार होत आहेत, यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी/अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments