राज्य मागासवर्ग आयोगाने दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन व इतर खर्चाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भाधीन दि.१७.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविल्यानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुंबाचे सर्वेक्षणाच्या कामकाजामध्ये विभाग, जिल्हा, महानगरपालिका तसेच तालुका व वॉर्डस्तरावर नोडल ऑफ़िसर, असिस्टंट नोडल ऑफ़िसर व नोडल ऑफ़िसर च्या मदतीसाठी नियुक्त लिपीक यांना त्यांच्या मुळ वेतनाच्या ५०% इतके मानधन अदा करण्यात येणार आहे. सर्वेक्षण कामकाजाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांनी केलेल्या कामाची माहिती सॉफ़्टवेअरच्या माध्यमातुन तपासण्याचे काम सुरू आहे. सदर प्रगणकांना त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अदा करावयाची रक्कम आयोगामार्फत निश्चित करून वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
आपल्यामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या उर्वरित विभागीय, जिल्हा, महानगरपालिका, तालुका, वॉर्डस्तरीय अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक व पर्यवेक्षक यांना मानधन देण्याकरिता त्यांची अचुक माहिती खालील नमुन्यात जिल्हा स्तरावरून/ महानगरपालिका स्तरावरून आयोगास उपलब्ध करून देण्यात यावी.
तसेच मानधन व इतर रक्कम जमा करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे खालील नमुन्यात बँक खाते तपशिल सादर करावे. मानधन, प्रशिक्षण व स्टेशनरी खर्चाची रक्कम तपासून देय रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येईल. सदर रकमेचे वाटप करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय / महानगरपालिकास्तरीय नोडल ऑफ़िसर यांची राहील.
(बँक खात्याचा तपशिल)
अ.क्र.
कार्यालयाचे नाव
बँकेचे नाव
शाखा
खाते क्रमांक
खाते प्रकार
वरील प्रमाणे आपल्या अधिनस्त नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्यासाठी आवश्यक मानधनाची मागणी, तसेच प्रशिक्षणाकरिता व स्टेशनरी करिता झालेल्या खर्चाची तपासणी करून नियमानुसार झालेल्या खर्चाची मागणी आयोगास msebepunel @gamil.com या ई-मेलवर दि. २६ फ़ेब्रुवारी
२०२४ सायंकाळी ६:०० वाजेपर्यत पाठविण्यात यावी, ही विनंती.
आपली,
(आ. उ.पाटील)
सदस्य सचि
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments