परिपत्रक :
राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १.०३.३३३ शाळांनी अभियानात सहभाग नोंदविला असून शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सदर अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे.
राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.
उपक्रमाचे नाव : Largest online photo album of "Handwritten Notes in 24 hours".
www.mahacmletter.in
कार्यपध्दती :
१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे. २) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.
३) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.
४) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.
५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.
६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या
वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.
७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.
याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते दि. २७.०२.२०२४ सकाळी ०८.५९ आहे. सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
(सूरज मांदरे आ.प्र.से.)
आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे
फ्लोचार्ट (Flowchart)
स्टेप- 1
संकेतस्थळ www.mahacmletter.in ला भेट द्यावी
स्टेप - II
Upload handwritten note photo या बटनावर क्लिक करावे
स्टेप - III
मोबाइल क्रमांक नमूद करावा
पुनःश्च मोबाइल क्रमांक नमूद करावा
Captcha दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा
Continue बटनावर क्लिक करावे
स्टेप-
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, जिल्हा, तालुका निवडावा
Continue बटनावर क्लिक करा
स्टेप
मा. मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी / शिक्षण विषयक अभिप्रायांचा स्वतःच्या हस्ताक्षरातील फोटो अपलोड करावा
Submit वर क्लिक करावे
Congratulations असा संदेश दिसेल, म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदविला गेला आहे
धन्यवाद !
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
16 Comments
8007440437
ReplyDeleteYes...?
Deletechavanashok596@gmail.com
ReplyDelete8010030419
Manthan Ashok Chavan
Yes?
DeleteCaptcha nahi aa raha hay
ReplyDeleteRefresh the browser...
Deletehow to do its not happening only
ReplyDeleteWait & try Again 🙏
DeleteShruti
ReplyDeleteYes..?
DeleteThe link is not opening , what to do??
ReplyDeleteUnder Maintenance
Delete9975713207
ReplyDeleteकविता सहदेव सारोज
Yes??
DeleteAfghhhjjjjjkkkjh
ReplyDelete??
Delete