महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील तरतूद वगळणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
शासन निर्णय :-
शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४५/विमा प्रशासन, दि.०४ फेब्रुवारी, २०१६ मधील परिच्छेद क्र.९ मध्ये "प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेर सेवा निवृत्तीसाठी ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही," ही तरतूद वगळण्यात येत आहे.
२. शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१७/प्र.क्र.६९/विमा प्रशासन, दि.११ ऑगस्ट, २०१७ मधील परिच्छेद क्र.१२ मध्ये "माहे एप्रिल ते माहे सप्टेंबर या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही." ही तरतूद वगळण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२०६१६५१४७२१०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
( वि. रं. दहिफळे ) सह सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments