शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधानुसार करावयाच्या कार्यवाही बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अर्शतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ अन्वये निश्चित केलेल्या सुधारित आकृतीबंधास व त्यानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात दि.०७.०३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीस मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र.८००७/२०२१ व रिट याचिका क्र.५०५८/२०२१ मध्ये मा. न्यायालयाने दि.०६.०९.२०२१ रोजीच्या आदेशान्वये अंतरिम स्थगिती दिली होती.
प्रस्तुत रिट याचिकेत मा. न्यायालयाने दिलेले अंतरिम स्थगिती आदेश रद्द करण्यासाठी शासनाच्या वतीने मा. उच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्र.ST. १६३३७/२०२३ दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने दि.०६.०२.२०२४ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणी दाखल सर्व रिट याचिका व सर्व अंतरिम अर्ज निकाली काढले आहेत. (प्रत संलग्न)
सबब, या प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेऊन शासनाच्या दि.२८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार व दि.०७.०३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार खाजगी अनुदानित/अशंतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेतर पदांच्या संचमान्यता व त्याअनुषंगाने इतर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरु करावी.
प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीसाठी, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
(विशाल लोहार ) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 28 जानेवारी 2019 रोजी चा शिक्षकेतर कर्मचारी राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः अनुदानित पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे बाबतचा शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध व निकष लागू केल्यामुळे व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे त्या पदावरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भात करावयाच्या कार्यवाही समावेशनाच्या अटी शर्ती व कार्यपद्धती विहित करणारा दिनांक 7 मार्च 2019 रोजी चा शासन निर्णय पीडीएफ डाउनलोड.👇
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments