महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे दिनांक 7 फेब्रुवारी 2024 च्या पत्रानुसार सन 2023 24 शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांमध्ये प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत प्रस्ताव सादर करणेबाबत पुढील प्रमाणे आदेश देण्यात आले आहे.
शासन निर्णयान्वये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतलेला आहे. पुणे विभागीय मंडळाने संदर्भिय २ च्या पत्रान्वये शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण प्रस्ताव सादर करणेबाबत मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे
दि.१५ते २९ फेब्रुवारी २०२४
२ दि.१५ ते २५ मार्च २०२४
महत्त्वाची सूचना पात्र प्रति विद्यार्थ्यासाठी
भारतीय शालेय खेळ महासंघ द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा क्रीडा संचालनालयाने क्रीडा सवलत गुण देण्यास मान्यता दिलेल्या अधिकृत एकविध खेळ संघटना द्वारा आयोजित राज्यस्तर/राष्ट्रीयस्तर क्रीडा स्पर्धा
प्रत्येक रु.२५ रुपये छाननी शुल्क पुणे विभागीय मंडळास जमा करुन त्या चलनाची प्रत संबधीत विद्यार्थ्यांच्या प्रस्तावासोबत सादर करणे बंधनकारक आहे.
१. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता, १० वी) परिक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ.६ वी पासून १० वी पर्यंत केव्हांही क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य मिळविले असल्यास क्रीडा सवलत गुण देण्यात येतील तथापी त्या विद्यार्थ्याने इ.१० वी मध्ये क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक राहील व सहभागाचा पुरावा (ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रत मुख्याध्यापक स्वाक्षरीनिशी जोडणे आवश्यक राहील)
२. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इ.१२ वी) मध्ये प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्याच्या बाबतीत इयत्ता ६ वी पासून १२ वी पर्यंत केव्हांही क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. परंतु सदर खेळाडूंस इ.१० वी मध्ये सदर प्रमाणपत्रावर क्रीडा सवलत गुण घेतले असल्यास यावर्षी तो क्रीडा सवलत गुण घेण्यास पात्र असणार नाही. तथापी या खेळाडूंने इ.११ वी १२ वी मध्ये प्राविण्य / सहभाग घेतला असेल तर तो क्रीडा सवलत गुण देण्यास पात्र राहील.
३. भारतीय शालेय खेळ महासंघ व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म. रा. पुणे आयोजित जिल्हा विभाग राज्य व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
४. खेळाडू कोणत्याही जिल्ह्यातून खेळला तरी, खेळाडू विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असेल त्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे शिफारशीसह प्रस्ताव सादर करावा. मान्यता दिलेल्या खेळप्रकारातील एकविध खेळ संघटनानी आयोजित
५. क्रीडा संचालनालयाने केलेल्या राज्यस्तर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरिल सहभाग व प्राविण्य खेळाडूच क्रीडा सवलत गुणास पात्र राहतील.
तथापी एकविध खेळ संघटनानी संदर्भ क्रं.१ च्या शासन निर्णयानुसार सन २०२३-२४ या वर्षातील आवश्यक सर्व कागदपत्रे व स्पर्धा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावीत जेणेकरुन खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर करता येतील, कागदपत्रे प्राप्त न झाल्यास सदर खेळाडूंचे प्रस्ताव शिफारस करता येणार नाहीत त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांच्या होणा- या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहाणार नाही.
६. इयत्ता १० वी १२ वी मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल तर सदर खेळाडूचे सर्वोच्च कामगीरी असलेल्या एकाच पात्र खेळाचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे.
७. प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी ही संबधीत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची राहील. शाळा कर्मचारी /शिक्षक यांचेमार्फत प्रस्ताव सादर करावेत पालकांसोबत प्रस्ताव पाठवू नये, संबधीत प्रस्तावात त्रुटीमुळे विद्यार्थ्यास क्रीडा सवलत गुण न मिळाल्यास संबंधीत शाळा/क. महाविद्यालय जबाबदार राहील.
सोबत : क्रीडा सवलत गुण अर्ज नमुना
(महादेव कसगावडे)
जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे
संपूर्ण परिपत्रक क्रीडा सवलत गुण अर्ज नमुन्यासह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
वरील परिपत्रक डाऊनलोड करून आपण पुढील वर्षासाठी नेमका किती उत्पन्नावर किती इन्कम टॅक्स पडेल हे जाणून घेऊ शकता.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments