दिनांक आठ फेब्रुवारी 2024 पर्यंत पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी मुदत देण्यात आली होती परंतु पोर्टलची तांत्रिक अडचण असल्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट होऊ शकले नव्हते त्यामुळे दिनांक आठ फेब्रुवारी 2024 रोजी रात्री उशिरा शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक पोर्टलवर अपलोड झाले आहे त्यानुसार उमेदवारांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तथापि, आज दुपारनंतर संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे उमेदवारांना आज प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
• संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक ०९/०२/२०२४ पासून देण्यात येत आहे.
• प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी व लॉक करण्यासाठी दिनांक १२/०२/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
उमेदवारांनी विहित मुदतीत आवश्यक ती कार्यवाही करावी.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments