Udise Plus 2023-24 Last Date - शिक्षक व विद्यार्थी पोर्टल आधार व्हॅलिडेशन बाबत MPSP चे नवीन निर्देश

 महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई ने दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सन 2023 24 प्लस प्रणाली मध्ये शाळा शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम पूर्ण करणे तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करून ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी संख्या कमी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

राज्यातील सर्व शाळांनी सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम १००% करणेबाबत आपण पत्राव्दारे, Zoom Meeting घेऊन व व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार कळविण्यात आले आहे, तरी देखील राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील युडायस प्लसची माहिती संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी अद्यापही पूर्ण केलेली नाही.

राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्याथ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणेसाठी जिल्हानिहाय य तालुकानिहाय Adhar Validation Report नियमितपणे पाठविण्यात येत आहे. परतू Adhar Validation चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation थे काम दि.३१/०१/२०२४ पर्यंत पूर्ण करून घ्यावे.

आपणास ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करण्याकरिता कळविण्यात आले आहे मात्र अनेक शाळांचा ड्रॉप बॉक्स अद्यापही शून्य झालेला दिसत नाही यासाठी आपल्या स्तरावरून कॅम्प घेऊन मुख्याध्यापकांकडून ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी त्वरित कमी करून घ्यावे अन्यथा आपल्या जिल्हयाच्या Performance Grading Index गुणांवर याचा विपरित परिणाम होईल त्यामुळे राज्याच्या शैक्षणिक निर्देशकांमध्ये (PGI) घट होईल.

याशिवाय केंद्र शासनाच्या दि.२२ जानेवारी, २०२४ च्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

सन २०२३-२४ करिता युडायस प्लस डेटाचा स्नॅपशॉट दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजता घेण्यात येईल, दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी डेटा पूर्ण करण्याच्या व तपासून खात्री करून घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

उपरोक्त सूचनांनुसार दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजीचा युडायस प्लस डेटा प्रमाणित करणेकरिता वापर करण्यात येईल.

ज्या शाळांचा डेटा अपूर्ण भरलेला असेल त्या शाळांचा संपूर्ण डेटा दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर सिस्टीमद्वारे पूर्णपणे डिलिट करण्यात येईल.

दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर डेटामधील कोणतेही बदल अॅप्लिकेशन रिअल टाइममध्ये अपडेट होईल, परंतु सन २०२३-२४ च्या डेटासाठी सदर अपडेट विचारात घेतले जाणार नाही. युडायस प्लस डेटामध्ये कोणतेही बदल तांत्रिक टीमद्वारे दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर केले जाणार नाहीत.

तरी आपल्या स्तरावरून दि. ३१ जानेवारी, २०२४ पूर्वी मुख्याध्यापकांकडून युडायस प्लस सन २०२३-२४ पोर्टलवरील संपूर्ण डेटा भरून घ्यावा.


सोबत: 1. School Profile Status as on dt.23/01/2024

2. Teacher Profile Status as on dt.23/01/2024 3. Student Profile Status as on dt. 23/01/2024

4. Student Adhar Validation Status as on dt. 23/01/2024 5. Teacher Adhar Validation Status as on dt.23/01/2024

6. Drop Box Status Std.1 to 12 as on dr.23/01/2024


(समीर सावंत)

राज्य प्रकल्प समन्वयक

तथा सहसंचालक (प्रशा.)


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.