पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरती बाबत शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी परिपत्रक निर्गमित करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक भरती बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधिन पत्रान्वये शासनाने शासन निर्णय दिनांक १९/०६/२०१३ मधील तरतुदी विचारात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणी प्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबत कळविले आहे. यानुसार पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळांकरीता नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे. तथापि, अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, म.रा.पुणे यांच्या अधिनस्त प्रादेशिक विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे. सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांचे कौशल्य/ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी.
२. स्थानिक स्वराज्य संस्थातील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्रक्र ५०९/ टीएनटी-१ दिनांक १३/१०/२०२३ मधील निर्देशास अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे. समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
३. यास्तव सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय दिनांक १९/०६/२०१३ नुसार सेमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ मधील तरतुदीनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास, साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करुन केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी. सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा तूर्त राखून ठेवण्यात याव्यात.
शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक ३०/०१/२०२४ अखेर पर्यंत पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक कार्यवाही पूर्ण करावी.
(सूरज मांढरे भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे-१
वनीला संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments