Teacher Recruitment 2022 Update - शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात!

 शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्याने इच्छूक उमेदवारांमध्ये समाधान; सर्व जिल्हा परिषदांच्या जाहिरातींची प्रतीक्षा: आतापर्यंत १५६ व्यवस्थापनांनी ७ हजार ७२० पदांसाठी उमेदवारी अर्ज मागविले. 

Portal link.👇

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx

Teacher Recruitment Advertisement Application in Maharashtra राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्यासह अन्य व्यवस्थापनाच्या शिक्षक भरतीच्या जाहिरात प्रसिध्द होऊ लागल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यातील १४ जिल्हा परिषदा, १५ नगरपालिका आणि दोन महानगरपालिका यांच्यासह १२५ खासगी व्यवस्थापन अशा एकूण १५६ व्यवस्थापनाकडून सात हजार ७२० शिक्षकपदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या जाहिरातींची प्रतीक्षा आहे.


सध्या विविध जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या व्यवस्थापनांकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे. यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठी सहा हजार ८४५ शिक्षकांच्या पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. माध्यमनिहाय बिंदूनामावली असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र जाहिराती असतात. बुलढाणा जिल्हा परिषदेने अगोदर शिक्षक भरतीची जाहिरात दिली. हळूहळू इतर व्यवस्थापनाच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत.


आताच्या अपडेटनुसार सध्या राज्यात एकूण १५६ व्यवस्थापनांकडून तब्बल सात हजार ७२० शिक्षकांच्या पदांची जाहिरात शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर दिली आहे. या शिक्षक पदांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणाऱ्या आणि पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बहुप्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षक भरतीतील किमान काही जागांची जाहिरात निघाल्याने शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी पवित्र प्रणालीमध्ये वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेल्या उमेदवारांना जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संबंधित पात्र उमेदवारांना पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकविण्यासाठी नियुक्त केंद्र शालास्तरावर एक शिक्षक याप्रमाणे इंग्रजीतून शिक्षण झालेल्या उमेदवारांमधून हे पद भरण्यात येणार आहे. परंतु, त्याला मराठी माध्यमाच्या उमेदवारांकडून विरोध दर्शविला जात आहे.


काही इच्छुक उमेदवारांनी सांगितले कि, राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्यासह खासगी व्यवस्थापनांमधील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक भरतीची जाहिरात अधिकृतरीत्या प्रसिद्ध झाल्याने आनंद होत आहे. परंतु, इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षक पदांसाठी पात्र केल्याने त्यांना जास्त संधी मिळणार असून, मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे. अशी नाराजी व्यक्त केली. खासगी संस्थांच्या जाहिराती पुढील टप्प्यात येणार असल्याने शिक्षक भरती फसवी होणार की काय, असा प्रश्न पडत आहे.असेही काहींचे म्हणणे आहे.


राज्यातील विविध व्यवस्थापनांच्या शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. अद्याप पूर्ण जाहिराती अपलोड झाल्या नाहीत. त्यात इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी वेगळी जाहिरात देण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे गुणवत्ताधारकांवर अन्याय होणार आहे, असे इच्छुक उमेदवारांकडून बोलले जात आहे.


राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी पात्र असणारे अनेक बेरोजगार शासनाकडून शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा काढली जाते, याकडे डोळे लावून बसले होते. दीपक केसरकर यांनी राज्यात ३० हजार शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार असल्याचे घोषित केले आहे. परंतु, रिक्त जागांची माहिती जमा करणे, रोष्टर तपासणी, समान आरक्षण तपासणी यासह अनेक प्रशासकीय बाबींमूळे शिक्षक भरतीस विलंब होत होता.


आता बहुतेक जिल्ह्यांचे समांतर आरक्षण तपासणीचे काम पूर्ण झाले असावे असे दिसते. त्यामुळे आता जाहिराती पोर्टलवर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आनंद झाला नसेल तर नवलच!


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.