मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये एकूण शंभर गुणांपैकी दहा गुण हे स्वच्छता मॉनिटर 2023 दुसरा टप्पा यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
पाहूया स्वच्छता मॉनिटर 2023 दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी कशी करायची?
नोंदणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा किंवा गुगल वर स्वच्छता मॉनिटर असे सर्च करा लिंक👇
वरील लिंक वर टच केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
आपल्या मोबाईलवर ओपन झालेल्या वरील विंडो मधील School Login या निळ्या बटन वर क्लिक करावे आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या शाळेचा 11 अंकी यु डायस नंबर अचूक नोंदवून त्याखालील हिरव्या रंगाच्या Enter बटन वर क्लिक करावे आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
सदर माहिती मध्ये आपला विभाग, जिल्हा, तालुका, शाळेचा प्रकार, शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापकाचा व्हाट्सअप क्रमांक, स्वच्छता मॉनिटर शाळा कॉर्डिनेटर चे नाव व व्हाट्सअप क्रमांक पटसंख्या नोंदवावा लागेल. .
त्यानंतर आपण स्वच्छता मॉनिटर उपक्रमाबद्दल ज्या सोशल मीडिया द्वारे पोस्ट करणार आहात त्या सोशल मीडियाचा शाळेचा किंवा वैयक्तिक आयडी तीन पैकी एक किंवा तिन्ही देखील फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम नोंदवू शकता.
त्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यासाठी उपलब्ध सुविधा पैकी एक पर्याय निवडावा.
त्यानंतर ऍक्टिव्हिटी मध्ये पर्यायांपैकी निशुल्क किंवा सशुल्क पैकी एक पर्याय निवडावा.
सर्वात शेवटी आपल्या शाळेचा पासवर्ड ज्यामध्ये एक किंवा अधिक कॅपिटल लेटर एक किंवा अधिक स्मॉल लेटर एक किंवा अधिक स्पेशल कॅरेक्टर व एक किंवा अधिक नंबर असेल अशा प्रकारचा पासवर्ड कमीत कमी आठ कॅरेक्टर असलेला पासवर्ड दोन्ही ठिकाणी सारखा टाकावा व सर्वात शेवटी असलेल्या Register या हिरव्या रंगाच्या बटन वर क्लिक करावे.
आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
आगोदर Register असलेल्या शाळांना Update Successfully असा मैसजे दीसेल तर नवीन नोंदनी केल्यास Register Successfully असे हिरव्या रंगात दीसेल.
स्क्रोल करुन सर्व माहिती पुन्हा तपासता येते.
लिंक👇
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments