प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आज दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदानाबाबत आदेश निर्गमित केला आहे सदर आदेशानुसार माहे जानेवारी 2024 या महिन्याच्या वेतन व भत्ते निवृत्तीवेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व चौथा हप्ता यासाठी तसेच वैद्यकीय देयके थकीत देयके अदा करण्यासाठी तरतूद शासकीय कोषागारातून सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना उपलब्ध करून दिली आहे.
अर्थातच जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते तसेच थकीत देयके वैद्यकीय देयके यामुळे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष २२२०२०१७३/३६ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा ३ रा हप्ता व ४ था रा हप्तासाठी, तसेच वैद्याकीय देयके, थकीत देयके अदा करावयाची आहे.
लेखाशिर्ष २२०२०१७३/०४ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद सातव्या वेतन आयोगाचा ४ था, व अशंराशीकरण, उपदानासाठी अदा करावयाची आहे. उपरोक्त बाबीशिवाय इतर बाबींवर खर्च करण्यात येवू नये.
सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच (जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत) त्यांना प्राधान्य क्रमाने ४ था हप्ता, व अशंराशीकरण, उपदान तरतूद अदा करण्यात यावी. उपरोक्त बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे. उपरोक्त रक्कम खर्च झाल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसांत संचालनायास सादर करावा.
ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.
अ आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षीनहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा प्रेमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.
इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४ नियम ३९ (ब) टिप-४ अनुकंमाक ५नियम ३९
(ब) टिप-५तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे. वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये, वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई- मेलवर देण्यात आलेली आहे.
(देविदास कुलाळ) शिक्षण उपसंचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
वरील संपूर्ण वेतन वितरण आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments