शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य कार्यालयातील दिनांक दहा जानेवारी 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार प्रोजेक्ट लेट्स चेंज (PLC) स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा राबविण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी सर्व शिक्षण उपसंचालक, महानगरपालिका प्रशासन अधिकारी सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक सर्व, यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनी राजभवन, मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात PLC स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसन्या टप्याचे लोकार्पण केले आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात या उपक्रमाचा समावेश करुन त्यासाठी १० गुणांचे महत्व दिले गेले आहे.
स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा खालील प्रमाणे राबवायचे आहे.
१. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) तसा अहवाल या कार्यालयाच्या cmschoolpro@gmail.com ईमेलवर कळवावा.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी संयुक्त जिल्हा समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करून सर्व गटशिक्षणाधिकारी व PLC स्वच्छता मॉनिटर २०२३ दूसरा टप्पा राज्य समितीचे आपल्या विभागासाठी नियुक्त सदस्य यांना कळवावे,
३. PLC स्वच्छता मॉनिटर अभियान हे कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाचे असामाजिक कृत्य खरोखर रोखण्याची सवय विद्यार्थ्यांना होणे अपेक्षित आहे. सर्व जिल्हा समन्वयक, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी अभियानाची माहिती करुन त्यानुसार शाळांना सूचित करावे. . स्वच्छता मॉनिटर २०२३ दूसरा टप्पा मध्ये शिक्षकांनी किमान १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग
४ केल्यावाचत विचारण्याची सवय करून घेऊन, विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित करावे,
५. कचऱ्याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या लोकांना आपले स्वच्छता मॉनिटर त्यांची सवय चूक निदर्शनास आणून त्यामध्ये सुधारणा करण्यास प्रवृत्त करीत आहेत, याची खात्री करण्यासाठी किमान १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज प्रतिवर्ग एक विद्याथ्यांच्या अनुभवाचे विवरण व्हिडिओ चित्रित करुन दिलेले 'text' आणि # सहित सुचवल्या प्रमाणे सोशल मीडिया वर शेअर करावेत.
६. शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सक्रिय विद्यार्थी ह्या आधारावर गुणांकन करून सर्वोत्तम शाळा निवडल्या जातील, तसेच जिल्ह्यात एकूण शाळांच्या संख्येतील सक्रिय शाळांच्या आधारावर सर्वोत्तम जिल्हे ठरविले जातील,
७. स्वच्छता मॉनिटर २०२३ दूसरा टप्पा माहिती व नियंत्रणासाठी मॉनिटरिंग कक्षाची स्थापना करण्यात यावी.
(सूरज मांढरे, भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments