थकीत देयके ७ वा वेतन आयोग हप्ता इतर देयके - सर्व व्यवस्थापनांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या वेतना सोबत शालार्थ प्रणालीवर टॅब उपलब्ध.

 शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयातून निर्गमित 30 जानेवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सीमा विरुद्ध शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयके सातवा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

थकीत देयकांसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

१. थकीत देयके - खाजगी शाळांच्याबाबत संचालनालय स्तरावरुन ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आवक जेष्ठतेनुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

२. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा २, ३, व ४था हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणाली द्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लेखाशिर्ष २२०२०५५८,२२०२०५३१,२२०२०५४९,२२०२०५७६ मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, ३, राहिला असल्यास) चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.

३. लेखाशिर्ष २२०२०४४२,२२०२०४७८, मध्ये सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगाचा (१,२, ३, राहिला असल्यास) चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा,

४. लेखाशिर्ष २२०२३३६१ मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, राहिला असल्यास) ३ रा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.

५. उर्वरीत लेखाशिर्ष बाबत स्वतंत्र पत्र / सूचना देण्यात येतील.

६. अंशतः अनुदानित शाळेतील २० टक्के, ४० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व यावाढीव टप्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईन मधून अदा

५) करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरुन हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करण्यात यावी.

७. सन २०२३-२४ याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. देयके ऑनलाईन काढण्याची कार्यवाही करावी.

८. शासन निर्णय दिनांक ४/०१/२०२४ नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बैंक ऑफ इंडिया सीएमपी (Cash Management Product) इं-कुबेर (E- Kuber) प्रणालीमार्फत थेट कर्मचा-यांच्या बैंक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

९. सन २०२३-२४ वित्तीय वर्षातील माहे मार्च २०२३ पासूनची थकबाकी या वित्तीय वर्षामध्ये आहरित करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करावी. १०. थकीत प्रशासकीय मान्यतेची लोकायुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे प्रथम प्राधान्याने काढण्याची कार्यवाही करावी.

उपरोक्त देयके अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करण्यात आलेली आहे. वरील नमूद मुद्यातील देयके ऑनलाईन सादर करून पारीत करण्याची तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. दिलेल्या अनुदानाचा पूर्ण विनियोग दि.०७/०२/२४ पर्यतं करून अहवाल संचालनालयास सादर करावा.

मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.


(दिपक चवणे) शिक्षण उपसंचालक

(अंदाज व नियोजन)


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.