दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी पवित्र पोर्टलवर देण्यात आलेल्या नवीन सूचनेनुसार शिक्षक भरती 2022 बाबत पुढील प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था मधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात विषयक सूचना देण्यात आल्या आहेत.
१. स्थानिक स्वराज संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १५/०१/२०२४ पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीतजास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत दिनांक २२/०१/२०२४ पर्यंत वाढविण्यात आली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे.
२. वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक २४/०१/२०२४ पर्यंत पूर्ण करता येईल.
३. विभागीय शिक्षण उपसंचालक / शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)/शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ मधील तरतुदींनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीस देण्याची कार्यवाही करावी.
४. विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा दिनांक २९/०१/२०२४ पर्यंत देण्यात येईल.
५. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील.
६. वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीचे पालन करावे.
वरील सूचना पत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments