प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी आयोजित परीक्षा पे चर्चा 2024 या कार्यक्रमास राज्यातील शाळांमधून प्रसिद्धी देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
केंद्र शासनामार्फत 'परीक्षा पे चर्चा २०२४' हा कार्यक्रम दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मा. पंतप्रधान महोदय, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी 'परीक्षा पे चर्चा २०२४' च्या आणखी एका नवीन रोमांचक आवृत्तीमध्ये दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकाळी ११.०० वाजता संवाद साधणार आहेत.
तरी त्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रात सदर योजनेबद्दल पुरेशी प्रसिद्धी मिळणेकरीता (https://drive.google.com/drive/folders/liCoDDBbijPVJIVM2X3jH5OvAQkI6606?usp=sharing) या link वर उपलब्ध करून देण्यात आलेले बॅनर प्रत्येक शाळेतील दर्शनीय ठिकाणी लावावीत. तसेच सदर योजनेकरिता लागणारा खर्च समग्र शिक्षा अभियान योजनेमधील योग्य त्या लेखाशिर्षा अंतर्गत भागविण्यात यावा.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments