परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे सर्व शाळांमधून थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देणे व सेल्फी स्थळ (selfy point) तयार करणे बाबत SCERT चे निर्देश पुढील प्रमाणे.
मा. पंतप्रधान हे परीक्षा पे चर्चा २०२४ या कार्यक्रमांतर्गत देशातील सर्व शाळांमधील इयत्ता सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी दि २९ जानेवारी २०२४ रोजी स. ११.०० वा भारत मंडपम प्रगती मैदान नवी दिल्ली येथे संवाद साधणार आहेत सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, आकाशवाणी, फेसबुक, यु-ट्यूब, दीक्षा, स्वयंप्रभा इ स्वरूपाच्या विविध प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होणार आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ आपल्या अधिनस्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी आपल्या स्तरावरून सोबतच्या संदर्भीय पत्राप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच संदर्भ पत्र क्र.(२) अन्वये महाराष्ट्रात नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व नागपूर या शहरांमध्ये सार्वजनिक स्थळी ( बस स्थानक, विमानतळ, रेल्वे/ मेट्रो स्टेशन, पोस्ट ऑफिस इ. स्थळी सेल्फी स्थळ तयार करावे व त्याद्वारे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सेल्फी घेऊन तो QR कोड द्वारे Mygov या पोर्टल वर अपलोड करण्याबाबत सर्व शाळांना सूचित करावे, तसेच या कार्यक्रमाची प्रसिद्धी व प्रचार व्हावा यासाठी खाली दिलेल्या लिंकवर विविध भापातील व्हिडिओ प्रसार माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावे. सदर उपक्रमाची योग्य कार्यवाहीच्या फोटोसह अनुपालन अहवाल या कार्यालयाच्या मूल्यमापन विभागाच्या evaluationdept@maa.ac.in या इमेल पाठवावा.
https://drive.google.com/drive/folders/lowYAoVbxzmQownQTrlKuVHiiv9ol/YUk?usp=sharing
सोबत - संदर्भीय पत्र
अमोल येडगे
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments