महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाकडील दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. त्याअनुषंगाने राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.
दि. २० जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ़्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल. हे वॉर्ड व तालुक्याचे प्रशिक्षक दि.२१ व २२ जानेवारी २०२४ रोजी संबंधीत तालुक्याच्या / वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील / वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण देतील व दि. २३ जानेवारी २०२४ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होईल. हे सर्वेक्षण दि. ३१ जानेवारी २०२४ पुर्वी पूर्ण करावयाचे आहे.
या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फ़त ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
(आ. उ.पाटील)
सदस्य सचिव
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments