मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांची सर्वेक्षण 2024 कोणत्या कालावधीत/वेळेत करावे?

 दिनांक 23 जानेवारी 2024 पासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षण बाबत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दि. २३ जानेवारीपासून सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दि. २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण होईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत.

नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.

सर्वेक्षणा दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही.

सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात.

तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे.


सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.