कला संचालनालय महाराष्ट्र राज्य कार्यालयातून निर्गमित दिनांक 19 जानेवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय रेखला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2023 निकाल जाहीर करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
कला संचालनालयाच्या दिनांक १२.०७.२०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२३ ते ०७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी www.doa.maharashtra.gov.in/
https://dge.doanh.in या संकेतस्थळावर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करणे /निकाल पडताळणी / ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील खालील प्रमाणे.
२ प्रमाणपत्र
४ निकाल पडताळणी
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा
सहभागी शाळेना लॉगइनवरुन ३ वेळा डाऊनलोड करता येईल.
३ दुय्यम निकालत्रक
केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल.
दि.३१.०१.२०२४ दुपारी १२.००
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा
दि.०५.०२.२०२४ दुपारी १२.००
३ दुय्यम निकालत्रक
केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल.
ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन अर्ज करता येईल. दिनांक २२.०२.२०२४ पर्यंत (प्रत्येकी रु.६०/- प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे)
५ प्रमाणपत्र दुरुस्ती ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास त्रुटींच्या ફુટીઝ दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक २२.०२.२०२४ पर्यंत अर्ज करता येईल. (प्रमाणपत्र दुरुस्ती करिता प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.१००/- व (महाराष्ट्राबाहेरील) रु.२००/- प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे)
आपल्या केंद्रावरील सहभागी शाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थ्यांचे निकाल दिनांक ३१.०१.२०२४ व दिनांक ०५.०२.२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने मिळणार असल्याबाबतची माहिती सहभागी शाळांना / सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.
विहीत कालावधीमध्ये प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करुन निकालपत्रानुसार प्रमाणपत्र बरोबर असल्याची खातरजमा केंद्र प्रमुखांनी करुनच संबंधितास वितरीत करण्यात यावे.
डाऊनलोड केलेली प्रमाणपत्रे जतन करुन ठेवावीत. व संबंधितांना मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात यावीत. डाऊन लोड केलेली प्रमाणपत्रे व दुय्यम निकालपत्रके जतन करुन ठेवण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखाची राहील. केंद्र प्रमुखांनी प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी जतन करुन ठेवावी व सहभागी शाळा तसेच विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र प्रमुखांची राहील.
(ना.म.वाघमोडे)
परीक्षा नियंत्रक,
कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments