महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कधी कार्यमुक्त करावे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि.२३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रीया Vinsys IT Services (1) Pvt. Ltd, या संस्थेकडून पूर्ण करण्यात आलेली असुन बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येऊन संबधित जिल्हा परिषदाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
बदली प्रक्रीया राबविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणीक हित महत्वाचे असुन त्यात खंड पडू नये यास्तव शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावा.
आपला,
(पो.द. देशमुख)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments