महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मुख क्रीडा विभागाने दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणी बाबत शुद्धिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा गणवेश देण्यात यावा यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
सदरशुद्धिपत्रकानुसार आता राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलीं करिता पिनो फ्रॉक इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलींकरिता शर्ट व स्कर्ट आणि आठवी मधील मुलींकरिता सलवार-कमीज व ओढणी असा इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलींचा गणवेश असणार आहे तर..
इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांकरिता हाफ पॅन्ट व हाफ शर्ट व इयत्ता आठवी मधील मुलांकरिता फुल पॅन्ट व हाफ शर्ट याप्रमाणे गणवेश रचना असणार आहे.
शुद्धिपत्रक पुढीलप्रमाणे.
शुध्दिपत्रक:-
उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामधील अनु. क्र.२ मध्ये पुढीलप्रमाणे २ (अ) समाविष्ट करण्यात येत आहे.
२ (अ) :- राज्यातील इ.१ ली ते इ.४ थी पर्यंतच्या मुलींकरीता पिनो फ्रॉक (Pino Frock), इ.५ वी ते इ.७ वी पर्यंतच्या मुलींकरीता शर्ट व स्कर्ट आणि इ.८ वी मधील मुलींकरीता सलवार-कमीज व ओढणी तसेच, इ.१ ली ते इ.७ वी पर्यंतच्या मुलांकरीता हाफ पँट व हाफ शर्ट व इ.८ वी मधील मुलांकरीता फुल पॅट व हाफ शर्ट याप्रमाणे गणवेशाची रचना करण्यात यावी.
२. सदर शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०१२४१५२५१५९३२१ असा आहे. सदर शुध्दिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(इ.मु.काझी) सह सचिव, महाराष्ट्र शासन
वरील शासन आदेशाचे शुद्धिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments