महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या सचिव यांनी दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी जाहीर प्रकटनाद्वारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.
इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समान घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून काल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यांत यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्यांची सविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.
तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांचे वेळीही सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीची दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल.
सकाळ सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २:३० वाजता परीक्षाच्याने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
वरील प्रकटनानुसार महाराष्ट्र बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांसाठी दहा मिनिटे अधिकचा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे.
वरील प्रकटन संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments