महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर पदांची वेतन निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता प्रदान करण्यासाठी अतिरिक्त तरतूद विधिमंडळ अधिवेशना पूरक मागण्या अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे.
त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचा थकीत असलेला तिसरा व चौथा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे या अधिवेशनादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग थकबाकी मधील बाकी असलेला तिसरा व चौथा हप्ता प्रदान करण्यासाठी पूरक मागणी अंतर्गत अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात जरी आला तरी प्रत्यक्ष वेतन मात्र एक जनेवारी 2019मध्ये सर्व कर्मचाऱ्यांना मिळाले परंतु 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 यादरम्यान वाढीव पगारातील फरक हा शासनाने एकूण पाच हप्त्यात कर्मचाऱ्यांना देण्याची ठरवले त्यातील पहिला हप्ता मार्च 2020, दुसरा मार्च 2021, तिसरा मार्च 2022, चौथा मार्च 2023 पाचवा व शेवटचा मार्च 2024 ला मिळणे अपेक्षित होते परंतु आतापर्यंत फक्त दोन हप्ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments