५० वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ (RBVP) सर्व शिक्षक, पालक ,विद्यार्थी यांचे साठी YouTube and Facebook Live Link

 राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी

सर्व शिक्षक, पालक ,विद्यार्थी यांनी खालील लिंक ला क्लिक करून राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी याचा लाभ घेण्यात घ्यावा.


YouTube live link

https://www.youtube.com/live/SqsFmPYZGks?si=764W4fFl-Nx3qsAC


Facebook live link

https://www.facebook.com/profile.php?id=100064113641123&mibextid=kFxxJD


प्रस्तुत कार्यक्रम शिक्षक, विद्यार्थी यांना दाखविल्याचे फोटोज् या गटावर शेअर करावेत.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे करिता मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RBVP), २०२३ चे आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने आपली संमती दिली असून श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे दिनांक २६/१२/२०२३ ते ३०/१२/२०२३ या कालावधीत सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. शिक्षणमंत्री, मा. राजकीय प्रतिनिधी तसेच केंद्र शासन व राज्य शासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व अधिकारी, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शिक्षण क्षेत्रातील इतर लाभार्थी यांना दिनांक २६/१२/२०२३ रोजी सकाळी १०. ३० वाजेपासून खालील समाज माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

YouTube- 

https://www.youtube.com/live/SqsFmPYZGks?si=764W4fFl-Nx3qsAC


8. २. Facebook-


https://www.facebook.com/profile.php?id=100064113641123&mibextid=kFxx.JD


तसेच प्रस्तुत प्रदर्शनीत बाल वैज्ञानिक यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे माहितीपर व्हिडीओ या https://www.youtube.com/@SCERTMaharashtra यु-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व याबाबत WhatsApp संदेशाद्वारे वेळोवेळी अवगत करून देण्यात येणार आहे.

सदर माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांना व बालवैज्ञानिकांना वैज्ञानिक संकल्पना समजणे व नवीन वैज्ञानिक प्रयोग विकसित करण्यामध्ये निश्चितच होईल. तरी सदर माहितीचा लाभ विद्यार्थ्यांना घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सर्व शिक्षकांना कळविण्यात यावे. तरी प्रस्तुत उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था सर्व शाळामध्ये करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. तसेच सर्व अधिकारी, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शिक्षण क्षेत्रातील इतर लाभार्थी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतील, यादृष्टीने नियोजन करावे.


(अमोल येडगे,भा. प्र.से.)

संचालक

SCERT, महाराष्ट्र,पुणे


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.