विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी नोंदवणे सुरू आहे तसेच संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन सत्र २०२३-२४ चे गुणदेखील ऑनलाईन नोंदवणे सुरू आहे या दोन्ही गोष्टी करत असताना काही समस्या उद्भवल्या आहेत त्या समस्यांवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई अंतर्गत विद्या समीक्षा केंद्र पुणे ने अधिकृत पणे या समस्यांवर उपाय सुचवले आहेत त्या समस्या आणि त्यावरील उपाय पुढील प्रमाणे.
समस्या १. Invalid U-DISE कोड
शाळेतील रेकॉर्डस, शाला मान्यता प्रपत्र व UDISE प्रपत्र यावर UDISE कोडची पडताळणी करावी. तालुका समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करुन UDISE कोड ची पडताळणी करावी.
समस्या २ Invalid मोबाईल क्रमांक
सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर मुख्याध्यापक / DDO-1 यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षण अधिकारी /DDO-2 यांनी approval दिल्यानंतर किमान ८ दिवस प्रतीक्षा करा. हाच मोबाईल नंबर UDISE पोर्टल व सरल प्रणाली वर सुद्धा नोंदविण्यात यावा.
समस्या ३ Invalid शालार्थ / शिक्षक आय.डी.
मुख्याध्यापक / DDO-1 यांच्याकडून शालार्थ पोर्टलवरून शिक्षक आय. डी. प्राप्त करून घ्यावा. तसेच, शालार्थ आय. डी. व UDISE कोड विसंगत असल्यास अपडेट करावा.
समस्या ४ उपस्थिती चिन्हांकित होत नाही.
आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे सरल व UDISE पोर्टल वर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल.
समस्या ५ पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे.
वेतन प्रणाली, शालार्थ पोर्टल व UDISE वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी. अन्यथा जुन्या शाळेच्या पोर्टल वर नावे दिसत राहतील. सेवानिवृत शिक्षकांची नावे वेतन प्रणाली मधून DELETE करावी.
समस्या ६ मदरसा मध्ये जाणारे विद्यार्थी
शालार्थ वेतन प्रणालीतून वेतन मिळत असल्यास सदर मदराश्यातील विद्यार्थ्यांची माहिती भरता येते.
समस्या ७ मागील वर्गातील विदयार्थ्यांची नावे दिसत आहे. विद्यार्थ्यांचे सरल पोर्टल वर पुढील वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी.
समस्या ८ शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी
सदर विद्यार्थ्यांची सरल पोर्टल वर New Tab घेऊन इयत्तनिहाय नोंद करावी. New Tab करता तालुका समग्र शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा.
समस्या ९ सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत
वेतन प्रणाली/ शालार्य पोर्टल व UDISE वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी.
समस्या १० सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत
आपल्या वर्गातील मुलांची नावे सरल व UDISE पोर्टल वर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल.
समस्या ११ शून्य शिक्षक असलेली शाळा
सध्या माहिती भरू नये. अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी.
आम्हाला आशा आहे की वरील उत्तरे आपल्या समस्या सोडवतील.
पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments