महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अंड्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक: २० डिसेंबर, २०२३ शासन निर्णय.
केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या ५ टक्के निधीमधून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुरक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश केंद्र शासनाचे आहेत. त्यानुषंगाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये प्रस्तुत योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मंजूर निधीतून २३ आठवड्याकरीता नियमित पोषण आहारासोबत विद्यार्थ्यांना अंडी / केळी यांचा लाभ देण्याचा निर्णय दि.०७ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. प्रस्तुत उपक्रम राबविण्याकरीता अंड्याच्या दरामध्ये वाढ करण्याबाबत शिक्षक संघटना तसेच महिला बचत गटांनी विनंती केली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या रु.५/- प्रति अंडे या अंड्याच्या दरामध्ये वाढ करण्याबाबतची निवेदने तसेच, National Egg Coordination Committee यांच्या संकेतस्थळावरील अंड्यांचे दर विचारात घेवून अंड्याचा दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंडी उपक्रमासाठी अंड्याचे दर National Egg Coordination Committee यांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणाऱ्या संबंधित महिन्याच्या मासिक सरासरी दरानुसार सदर महिन्यातील कालावधीसाठी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२२०१६०४४३३३२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(प्रमोद पाटील) अवर सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments