पवित्र पोर्टल वर जिल्हा परिषद व इतर संस्थांना जाहिराती अपलोड करण्यासाठी 5 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी पर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार!
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरतीला वेग आला आहे. जिल्हा परिषदांकडून वेळेत 'पवित्र'वर जाहिराती अपलोड होण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेऊन मेरिट यादीनुसार १६ फेब्रुवारीपूर्वी नेमणुका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेला अंदाजे साडेपाचशे शिक्षक मिळणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ५५ ते ५७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये २३ हजार तर नगरपरिषद, नगरपालिका व महापालिकांच्या शाळांवर पाच हजारांपर्यंत आणि खासगी अनुदानित शाळांवर २७ हजारांपर्यंत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के पदभरतीस मान्यता आहे. राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपरिषदांच्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली तपासून घेतली आहे. त्यामुळे पदभरती वेळेत होईल, असा विश्वास शिक्षण आयुक्तांना आहे. तत्पूर्वी, २५ डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही. आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे.
पदभरतीनंतरही राहणार ३० टक्के रिक्त पदे
■ जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या ८० टक्के शिक्षक भरतीस मान्यता आहे. पण, बिंदुनामावलीवरील आक्षेप विचारात घेऊन १० टक्के पदांची भरती करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिल्याने सध्या ७० टक्केच शिक्षकांची भरती होईल. त्यामुळे आता भरतीनंतरही सात ते आठ हजार पदे रिक्तच राहणार आहेत. पण, ही भरती झाल्यावर शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा कधी, यावर कोणताही अधिकारी ठोसपणे सांगत नसल्याची स्थिती आहे.
रोस्टर अंतिम असल्यास 'माध्यमिक'चीही भरती
■ ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली (रोस्टर) तपासून अंतिम केले आहे. त्यांनाही शिक्षक भरती करता येणार आहे. त्यासाठी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारांनी त्या शाळांचा पर्याय निवडला, अशा तिघांना (एका जागेसाठी) त्याठिकाणी पाठविले जाणार आहे. त्यानंतर संबंधित संस्थेने त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments