परीक्षा पे चर्चा 2024 विद्यार्थी शिक्षक पालक नाव नोंदनी प्रक्रिया लिंक (flow chart) Pariksha Pe Charcha Students Teachers Registration Portal Link & Process

 परीक्षा पे चर्चा नाव नोंदनी (flow chart)

https://www-mygov-in.translate.goog/ppc-2024/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

       


  

                      ⬇️

Pariksha Pe Charcha Theme (Click)

                      ⬇️

         Participate now (Blue Colour Tab) Click

                      ⬇️Scroll Down

login with Mygov(black colour tab)

                      ⬇️(use mobile no as New Registration and Submit Otp) Create New Account 

                      ⬇️ (Redirecting on Home Page)

                      ⬇️

See Participate as

                 Student 

                 Teacher

                   Parent

        (Click on Submit)

मा. पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत परीक्षा पे चर्चा - ७ सन २०२४ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावी चे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे करिता आयोजित स्पर्धेबाबत..

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी "परीक्षा पे चर्चा ७" या कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसमवेत तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथे जानेवारी / फेब्रुवारी २०२४ मध्ये संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने २०५० विजेत्यांना मा. संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

परीक्षा पे चर्चा ७ या कार्यक्रमात आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेसाठी online स्वरुपात MCQ (बहुपर्यायी) प्रश्न स्पर्धा आयोजित करणेत आली आहे. सदर स्पर्धेत दिनांक १२ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत सहभागी होता येईल. तसेच मा. पंतप्रधान महोदय यांच्याशी संवाद साधण्यासाठी विचारायच्या ५०० शब्दात प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व पालकांना अवगत करण्यात यावे.

सदर कार्यक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी मा. पंतप्रधान महोदय यांचे समवेत होणा-या परीक्षा पे चर्चा - ७ कार्यक्रमासाठी online स्वरुपातील प्रश्नाची उत्तरे देतील. तसेच ५०० शब्दात मा. पंतप्रधान महोदय यांच्याशी संवाद साधण्यासाठी विचारण्यासाठी आपले प्रश्न तयार करतील व त्यातील NCERT मार्फत निवड केलेले काही प्रश्न सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष घेतले जाऊ शकतात. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या मागील आवृत्यांमध्ये सदर कार्यक्रमात प्रश्न विचारलेल्या सहभागींना मिडिया चॅनलद्वारे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. त्याच धर्तीवर यावर्षी निवडलेल्या काही सहभागींना माध्यमांशी संवाद साधण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थी, पालक व शिक्षक स्पर्धेत http://innovateindia.mygov.in/ppc-2024/ या वेबसाईटवरून सहभागी होण्यासाठी नाव नोंदवूण स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. तसेच मा. पंतप्रधान महोदय यांना प्रश्न विचारू शकतात. त्यापैकी काही विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची मा. पंतप्रधान यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यासाठी निवड होऊन संधी मिळू शकते.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या सूचना -

सदर कार्यक्रमाचे आयोजन करणेसाठी सूचना लवकरच खालील अधिकृत संबधित कार्यालयास कळविण्यात याव्यात. राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तुमच्या विभागाच्या आणि माध्यमिक मंडळ ( secondary boards) अंतर्गत कार्यरत सर्व शाळा आणि इतर संस्थांमधील प्रमुख ठिकाणे.

संबधित विभाग आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशातील दुय्यम मंडळे, शिवाय, परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दिशेने माननीय पंतप्रधानांच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करणेसाठी इतर नाविन्यपूर्ण उपायांचा अवलंब करू शकता असे कळविण्यात आले आहे.

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न शाळा व राज्यातील इतर बोर्डाशी सलग्न असलेल्या शाळांचे विद्यार्थी (CBSE, ICSE, केंब्रिज, ICSE) यांचा जास्तीत जास्त सहभाग ऑनलाईन स्पर्धेत नोंदविणे करिता आपल्या स्तरावरून प्रचार व प्रसार करणेबाबत कार्यवाही करणेत यावी.

सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसारासाठी व स्पर्धकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आपले कार्यालय व शाळांनी स्वतःची मिडिया योजना करून शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार कार्यालयाशी शेअर करू शकता असे कळविले आहे.

तसेच शाळांनी सुद्धा या कार्यक्रमासंदर्भातील स्वतःचे पोस्टर्स, नाविन्यपूर्ण व्हिडीओ समाज संपर्क माध्यमावर #PPC2024 हा हॅशटॅग वापरून पोस्ट करावेत. यामधून काही निवडक नाविन्यपूर्ण व्हिडीओ Mygov प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातील.

• सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसारासाठी स्पर्धकांच्या सहभागासाठी कार्यालय स्वतःची मिडिया योजना करून शालेय शिक्षण व साक्षरता विभाग कार्यालयाशी शेअर करू शकता असे कळविले आहे.

तरी उपरोक्त प्रमाणे सर्व सूचनेनुसार स्पर्धकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्यात.


(अमोल येडगे मा. प्र. से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

6 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.