दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांनी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सवाचे आयोजन करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मध्ये गणित विषयाचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. शालेय स्तरापासूनच गणित विषयाची गोडी लागावी यासाठी विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे.
गणित विषयाचे पूर्व प्राथमिक स्तरापासून कृती आधारित व आनंदायी पद्धतीने अध्यापन व्हावे यासाठी या स्तरापासूनच खेळ आधारित अध्यापन शास्त्र, गणितीय खेळ, कोडी, परिसरातील गणित यांचा समावेश दैनंदिन गणित अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत करावा याविषयी धोरणामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, गणित विषयाची ध्येये ज्यामध्ये पायाभूत स्तरावर प्रारंभिक संख्याज्ञान संपादन ते परिसरातील अनुभवांशी गणिताची जोड, व्यवहारात सहजतेने वापर ते उच्च विचार प्रक्रियांचे विकसन, गणितीय तर्क करणे, गणितीय मर्मदृष्टी (Mathematical Intuition) ते विचारांचे गणितीकरण यांचा समावेश आहे.
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सव-२०२३" चे आयोजन दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन राज्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये करण्यात यावे. यावर्षीच्या" गणितोत्सव" ची प्रमुख संकल्पना (Theme) "प्रत्येकासाठी गणित" (Mathematics For Every One) ही निश्चित करण्यात येत आहे.
सदर संकल्पनेवर आधारित "गणित्तोत्सव-२०२३" मध्ये खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. सदर नियोजन करत असताना विद्यार्थी, शाळा, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक यांचा सक्रीय व उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा.
गणित्तोत्सव-२०२३"
पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावयाचे उपक्रम संकल्पना (Theme) "प्रत्येकासाठी गणित" (Mathematics For Every One)
गणित परिपाठ /गणित गप्पा (Math's Talk)
गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी, पारंपरिक गोष्टीतील गणित, परिसरातील गणित, प्रत्येकासाठी गणित गणिती कोडी/ कूटप्रश्न, गणित विषयक गाणी/ बडबड गीते, इत्यादी
गणितीय रांगोळी, चित्रकला स्पर्धा भौमितिक आकार, आकृतिबंध, गणिततज्ञ रेखाचित्र व इतर /फलकलेखन सर्जनशील संकल्पना.
प्रश्न मंजूषा स्पर्धा
बौद्धिक कोडी, कूटप्रश्न, परिसरातील/व्यवहारातील गणित , खेळातील गणित गणित जत्रा/ गणित मेळावा / गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन /Mathematical concept short video शिक्षक साहित्य निर्मिती, विद्यार्थी साहित्य निर्मिती, गणित खेळ, गणित पेटीतील साहित्य, इ.
उपरोक्त सर्व उपक्रमामध्ये आपण, सर्व क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, गणित प्रेमी यांनी प्रदर्शनास भेटी द्याव्यात. उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटाचा व्हिडीओ व फोटो, समाज संपर्क माध्यमांवर (उदा. इंस्टाग्राम, फेसबुक व इतर) #Nationaleducationnpolicy२०२०, #Mathematicsday२०२३, #Ganitotsav२०२३, #Mathematicsforeveryone, #SCERTMAHARASHTRA या HASHTAG (#) चा वापर करून आपल्या व्हिडीओ, फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी व प्रस्तुत कार्यालयाचे अधिकृत फेसबुक पेज SCERT, MAHARASHTRA ला टॅग करावे.
" गणित्तोत्सव-२०२३ " चे आयोजन उत्साहाने व नाविन्यपूर्ण पद्धतीने व्हावे याकरिता आपले स्तरावरून प्रयत्न करावेत तसेच आपण व क्षेत्रीय अधिकारी यांनी भेट द्यावी.
(अमोल येडगे भा.प्र.से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments