शिष्यवृत्ती परीक्षा 2024 साठी दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुख्याध्यापक लॉगिन मधून ऑनलाइन विद्यार्थ्यांचे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानंतर त्यामध्ये मुदत वाढ देऊन दिनांक सात डिसेंबर 2023 पर्यंत पहिली मुदतवाढ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली होती.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुन्हा दुसऱ्यांदा मुख्याध्यापक लॉगिन मधून विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज आवेदन पत्र सादर करण्यासाठी दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे.
परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०१ सप्टेंबर ते ०७ डिसेंबर, २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमिती शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १५ डिसेंबर, २०२३ पर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. १५ नोव्हेंबर, २०२३ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
दि. ३१/१२/२०२३ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
(डॉ. नंदकुमार बेडसे)
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
ठिकाण - पुणे
दि. - 07/12/2023
पुणे - ०४.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9834314384 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments