सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ-
१) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/वे. दे/४५५६ दि. २३/८/२०२४.
३) अधीक्षक, वेतन व भनिनी पथक, (माध्यमिक) अहमदनगर यांचे पत्र क्र. शिअवेभनिनिप/वैदय. देयके/९०५/२०२४ दि. २/१२/२०२४.
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. २ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दि. ३०/९/२०२४ अखेर पर्यंतची वैद्यकीय देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन काढण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
तथापि दि. ३०/९/२०२४ नंतर ऑनलाईन वैद्यकीय देयके वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयास प्राप्त झाली असून नियमित वेतन झाल्यानंतर अनुदान शिल्लक असल्याने शिल्लक अनुदानामधून वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडून मागणी करण्यात येत आहे.
त्यानुसार सन २०२४-२५ या आथिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०४६९, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२१९०१ २२०२एच९७३ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी.
उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक यांनी देयके अदा करावीत. सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्रशासकीय मान्यता मिळालेली थकीत देयके अनुदान उपलब्धतेनुसार अदा करण्यात यावी.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई. यांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे नमूद लेखाशीर्षासाठी सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. व इतर देयके शालार्थमधून अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य 23 August 2024 चे निर्देश पूढील प्रमाणे.
संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.
२) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्य) संबधित सर्व यांचेकडुन वैद्यकीय देयकाची प्राप्त माहिती.
उपरोक्त विषयास अनुसरून वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांचेकडे दि. १३/८/२०२४ अखेर प्राप्त वैद्यकीय देयक संख्या व त्यासाठी लागणारी रक्कम याबाबतची माहिती मागविण्यात आली होती.
त्यानुसार वेतन पथक (माध्यमिक) यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सन २०२४-२५ या आथिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२०४६९ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी. (दिन् ३०/९/ 2028 अखेरपर्यंत) उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित वेतन पथक यांनी देयके अदा करावीत. सन २०२४-२५ मध्ये प्रशासकीय मान्यता/पुनर्मान्यता मिळालेली थकीत देयके अदा करण्यात नेऊ नये तथापि लेखाशीर्ष २२०२१९४८, २२०२१९०१ व २२०२एच९७३ मध्ये पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने सदर लेखाशीषाअंतर्गत वैद्यकीय देयके शालार्थमधून ऑनलाईन अदा करण्यात येऊ नये.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत- माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी.
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व
प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई, यांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे नमूद लेखाशीर्षासाठी सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी शालार्थमध्ये दिनांक ३०/०९/२०२४ अखेर पर्यंतच टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. व इतर देयके शालार्थमधून अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणाली मधुन ऑनलाइन अदा करण्या बाबत शिक्षण संचालक यांचे दि 1 डिसें 2023 रोजीचे निर्देश..
दि. २६/१०/२०२३ रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपुती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशीर्षनिहाय मागणी करण्यात आली होती. तसेच विविध संघटनेकडून मागणी करण्यात आली होती.
तथापि शासन पत्र क्र. वेतन-१२२३/प्र.क्र.१०१/टिएनटी-३ दि. २० नोव्हेंबर, २०२३ अन्वये ऑनलाईन पद्धतीन देयक अदा करण्याची प्रणाली विकसित करण्यास साधारणपणे १ महिन्याचा कालवधी लागणार असल्याने सदर प्रणाली मार्फतच थकीत देयक अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे शासनाने निर्देश दिलेले आहे.
सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा विसित करण्याची कार्यवाही सुरू असून शालार्थ प्रणालीमध्ये सदरची सुविधा उपलब्ध झालेनंतर २२०२०४४२. २२०२०४७८ व २२०२०४६९ या लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतूदीमधून वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
तथापि सदरची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ही आपल्या कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार अदा करण्याची दक्षता घ्यावी. तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करणेबाबत वित्त विभाग, आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात यावी. शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments