उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" सन २०२४-२५ माहिती पीडीएफ अर्ज

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील 12 वीनंतर 

 उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" सन २०२४-२५ साठी संपर्क करा. 

मा. सहाय्यक आयुक्त 

जिल्हा समाज कल्याण अधिकारी



 कार्यालय आपल्याकडे असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना माहिती असावी/ सांगा. 

विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/ तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

       सदर योजने करिता १२वी मध्ये किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे. दिव्यांग असल्यास किमान ५०% गुण आवश्यक.

    OBC,  VJ, NT & SBC साठी आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांचेशी संपर्क करावा. 

आधार योजना पीडीएफ अर्ज डाऊनलोड

Download


 महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करणेबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता योजना सुरु करण्यास मा मंत्रिमंडळाने दि.१९.१०.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.

त्यानुसार, सदर बैठकीत विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याबाबत संदर्भाधिन क्र.६ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयान्वये मा.अ.मु.स. (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दि.०१.१२.२०२३ रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले /घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून), आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी योजना लागू करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय -:

आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

०२. सदर योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करण्यात यावी.


०३. सदर योजनेसाठी रु.१०० कोटी इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

०४. सदर योजनेंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगिक बाबी संदर्भात स्वतंत्ररित्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.

०५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०९१/२०२३/व्यय-१४, दि.१३.११.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. 

०६. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२१३१६४५४१५७३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशा नुसार व नावाने,

(दिनेश चव्हाण)

उप सचिव, महाराष्ट्र शासन


वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.