केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक परिपत्रक निर्गमित केले आहे सदर परिपत्रकावरून केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 नेमकी कधी होणार याबाबतचे स्पष्टीकरण मिळते परिपत्रक पुढीलप्रमाणे.
वरील परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०१३' या परीक्षेचे आयोजन करणेबाबत संदभीय पत्रान्वये शासनस्तरावरून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३० या परीक्षेचे आयोजन माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये करण्यात येणार होते. परंतु काही प्रशासकिय कारणास्त सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, तरी सदर परीक्षेचे माहे डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवडयात ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.
सदर परीक्षा आयोजन सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी परीक्षा केंद्र निरीक्षक (Observer) यांची राहील. प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरीक्षक (Observer) नियुक्त करावयाचे असल्याने आपल्या कार्यालयातील कार्यरत असलेले वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी यांची माहिती या कार्यालयास खालील विहित नमुन्यात तात्काळ पाठविण्यात यावी. सदर अधिकान्यांना उपरोक्त नमुद प्रमाणे परीक्षा कालावधीत अन्य कोणतीही जबाबदारी देण्यात येऊ नये, तसेच अधिकान्याचे लगतचे नातेवाईक परीक्षेस प्रविष्ठ नाहीत अशाच अधिकाऱ्यांचे प्रत्येक जिल्हा निहाय किमान ४ (चार) नावे कळविण्यात यावी,
तरी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३० या परीक्षेचे आयोजन माहे डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवडयात ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.
परीक्षा प्राधान्य लक्षात घेता सदर माहिती दोन दिवसात उपरोक्त दिलेल्या विहित नमुन्यात एम.एस.एक्सेल मध्ये bpvmscepune2023@gmail.com या ई-मेल वर पाठविण्यात यावी.
(संगीता पोडेकर)
उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-01.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9834314384 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments