महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग, शिबीर कार्यालय, नागपूर दिनांक १८ डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विन्सीस कंपनी यांच्यासमवेत आज दि.१८/१२/२०२३ रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंग (V.C.) व्दारे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक (गट-क) संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीबाबत कळविण्यात येते की,
(अ) जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये संवर्ग-१ व संवर्ग-२ या संवर्गात अर्ज सादर कलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडून करुन घ्यावी. अशी पडताळणी करतांना नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणने मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी. सदर पडताळणीचे काम दि.१८, १९ डिसेंबर, २०२३ दोन दिवसात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.
(ब) प्रथ मतः सन-२०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधिन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. तद्नंतर नव्याने संधी दिलेल्या दि.३०/०६/२०२३ पर्यंत बदलीस पात्र ठरललेल्या उर्वरित प्राथमिक शिक्षकांची बदलीप्रक्रीया विन्सीस कंपनीने सुरु करावी.
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
सर जिल्हा अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे का?
ReplyDeleteMay 2024
Delete