सस्नेह नमस्कार,
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित पंधरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी असून या परिषदेचा विषय 'राज्य अभ्यासक्रम आराखडा-२०२४' त्याची पूर्वतयारी म्हणून आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या विषयावर राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा घेत आहोत. या प्रश्नमंजुषेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आपणही या प्रश्नमंजुषेत भाग घ्यावा. ही प्रश्नमंजुषा निःशुल्क असून ती ऑनलाइन स्वरूपात आहे. या प्रश्नमंजुषेची नियमावली व लिंक पुढे दिली आहे.
"राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा प्रश्नमंजुषा 2024"
प्रश्नमंजुषेविषयी सूचना:
१) परीक्षेची लिंक रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक दहा वाजता ओपन होईल. ती त्या वेळेपासून २४ तास खुली राहील.
२) प्रत्येकी १ गुणाचे २५ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा देता येईल.
३) प्रश्नपत्रिका तीन भागात असेल. पहिल्या भागात आपले नाव (प्रमाणपत्र हे देवनागरी लिपीत असल्यामुळे आपले नाव शक्य असेल तर देवनागरी लिपीत लिहावे), उत्तराची भाषा निवडावी लागेल. ती निवडून next बटन क्लिक केले की दुसरा भाग दिसेल. त्यात फोन नंबर, जिल्हा, व्यवसाय इत्यादी माहिती भरल्यानंतर next बटन क्लिक केले की तिसरा भाग दिसेल. या भागात प्रश्नपत्रिका दिलेली असून सर्व प्रश्न सोडवल्यानंतर submit हे बटन क्लिक करावे.
४) महत्त्वाचे:- ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी फक्त एकच संधी दिली आहे त्यामुळे उत्तराची खात्री करूनच सबमिट बटन दाबावे.
५) सबमिट बटन क्लिक केल्यावर आपल्या प्रतिसाद नोंदवला गेला आहे हा संदेश आणि त्याखाली view score हे बटन दिसेल. View Score बटन दाबल्यावर आपल्याला (उदा. 18/50 ) अशा पद्धतीने गुण दिसतील तर त्याचा अर्थ 18/25 असा घ्यावा.
६) एकाहून अधिक प्रतिसाद प्राप्त झाल्यास सर्वात आधी दिलेल्या प्रतिसादाचे गुण ग्राह्य धरले जातील.
७) गुण समान झाले तर ज्या स्पर्धकांनी पेपर आधी सबमिट केला अशांचा प्राधान्याने विचार करून विजेते निश्चित केले जातील.
८) प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ईमेलवर मिळेल. त्यासाठी ० ते ५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. ५ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रमाणपत्र न मिळाल्यास संजना पवार - 8291416216 यांच्याशी संपर्क साधावा.
९) महत्त्वाचे: प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गुगल फॉर्ममध्ये अचूक ईमेल निवडणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र पाठवण्याची प्रक्रिया स्वयंचलित असल्यामुळे ईमेलमध्ये त्रुटी असल्यास सर्टिफिकेट मिळणार नाही. याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
१०) या प्रश्नमंजुषेतील प्रथम दहा स्पर्धकांची नावे सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी शिक्षण विकास मंचाच्या सर्व व्हॉटसअप समूहात प्रसारित केली जातील.त्यांना ग्रंथभेट व गौरवपत्र देऊन शिक्षण परिषदेत सन्मानित करण्यात येईल.
परीक्षेची लिंक :-
https://forms.gle/AZUHfjb5mC5BKkG9A
सर्वांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!💐
डाॅ.वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर.
विषय : नवीन शैक्षणिक धोरण : भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण.
रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३
सकाळी ०९.३० ते संध्याकाळी ५.००
यावर्षी नवीन शैक्षणिक धोरण : भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण या विषयावर वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील विविध विषयांतून संविधानिक मूल्यांची रूजवणूक शालेय विद्यार्थ्यांमध्ये होत असते. ही रूजवणूक होत असताना नवीन शैक्षणिक धोरण-२०२०च्या संदर्भाने कोणकोणत्या घटकांकडे जागरूकपणे लक्ष दिले पाहिजे,याची सादरीकरणे या परिषदेत करण्यात येणार आहेत.
या परिषदेस आपणांस आग्रहाचे निमंत्रण...
कार्यक्रमाची ढोबळ रूपरेषा पुढीलप्रमाणे ....
चहा आणि नाश्ता: सकाळी ९:०० ते ९:३०
नोंदणी: सकाळी ९:३० ते १०:१५
सत्र १: उद्घाटन
शालेय शिक्षणात संविधान-
विद्यार्थ्यांचा टाॅक शो -
स्वागत–
प्रास्ताविक–
● 'शिक्षण विकास मंच'निर्मित 'नवोपक्रमांची नवलनगरी' या पुस्तकाचे प्रकाशन.
पुस्तक परिचय - महेंद्र गणपुले
▪️पुस्तक प्रकाशन
● डाॅ.कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा-२०२३.
● डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार.
● बीजभाषण -डॉ. सुनीलकुमार लवटे
● सत्र :२
भारतीय संविधान आणि शिक्षण - अँड. निलेश खानविलकर.
(संविधान अभ्यासक आणि वकील मुंबई हायकोर्ट)
भोजन अवकाश
दुपारी १.०० ते २.००
● सत्र :३
पंचायत समिती भोर शिक्षण विभाग सादरीकरण - शालेय शिक्षणातून संविधान.
● सत्र :४
● नवीन शैक्षणिक धोरण -२०२० आणि भारतीय संविधान.
डाॅ. कमलादेवी आवटे – उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
●सत्र ५ : खुली चर्चा
●सत्र :६
परिषदेचा आढावा व समारोप
अधिक माहितीसाठी संपर्क:
संजना पवार - 8291416216
ही परिषद मुंबई येथे प्रत्यक्ष होणार असून ती निःशुल्क आहे. या परिषदेत शिक्षक, मुख्याध्यापक, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार,अधिकारी, पालक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हे भाग घेऊ शकतात. ज्यांना रविवार दि. २६ नोव्हेंबर- २०२३ रोजी येणे शक्य आहे.त्यांनीच खालील गुगल फार्म भरावा.👇
https://forms.gle/Ju8ccmvXpxf1fnxq7
गुगल फॉर्म सबमिट केल्यानंतर व्हॉट्सॲप ग्रुप इन्व्हाईट लिंक दिसेल ती क्लिक करून व्हॉट्सॲप समूहात सामील व्हावे. पुढील सूचना त्याच समूहावर दिल्या जातील.
डाॅ.वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर,
जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,
मंत्रालयासमोर, मुंबई-२१
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments