राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांनी बोलवून घेऊन डिसेंबर, २०२३ पूर्वी कॅम्पमध्ये निकाली काढण्यासाठी आदेश होणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक : ०१.११.२०२३ रोजी शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहे.
श्री. श्रीकांत देशपांडे, व श्री. दत्तात्रय सावंत, माजी वि.प.स. यांच्या दिनांक ३०.०८.२०२३ रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे.
०२. राज्यातील ब-याच संस्था/शाळा कर्मचा-यांची, पात्र असतानाही वरिष्ठ / निवडश्रेणी / नियमित वेतनश्रेणी याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली नाहीत. सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याची विनंती उक्त पत्रान्वये केली आहे.
०३. सबब, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून आवश्यकतेनुसार योग्य तो निर्णय घेण्यात यावा, ही विनंती.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
Pradip shankar chavan
ReplyDeleteYes..
Delete