विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणेबाबत MPSP चे निर्देश.

 विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणेबाबत MPSP ने दिनांक 30 October 2023 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे, त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.


सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत राज्य मंडळाशी सलग्नित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इ. • 2 री ते ८ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अध्ययन निष्पत्ती निहाय ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहे.

सदर उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी आपल्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांना आदेशित करावे.


सोबत : १. साप्ताहिक स्वाध्याय वेळापत्रक

२. मार्गदर्शक सूचना


(समीर सावंत)

राज्य प्रकल्प समन्वयक तथा

सहसंचालक

म. प्रा. शि. प. मुंबई





संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.