महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या प्रकल्प संचालकांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी सन 2023 24 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदवने बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यातील मान्यता प्राप्त सर्व शाळांची माहिती दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी पर्यंत भरून अंतिम करण्याकरिता कळविण्यात आले आहे परंतू दि. २२ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार ८८.०८% शाळांची भौतिक माहिती अद्ययावत केलेली आहे, ७६.२७% शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केलेली आहे, ७१.७०% विद्यार्थ्यांची माहिती अंतिम केलेली आहे. २५,७८८ शाळांनी शिक्षकांची अद्यापपर्यंत माहीती भरण्याकरिता सुरुवातही केली नाही, तर १२.९४७ शाळांनी भौतिक माहिती भरणेकरिता चालढकल करित असल्याकारणाने माहिती पूर्ण न झाल्यामुळे राज्य व केंद्र शासनास सन २०२४-२५ व सन २०२५-२६ समग्र शिक्षा, स्टार्स व PM Shri योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विलंब होत आहे. याबाबत आपणास कळविण्यात येते की, जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांना दि. ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती अंतिम करण्याकरिता कळविण्यात यावे. शाळांनी माहिती अद्ययावत न केल्यास सदर शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येवू नये. जिल्हा व तालुका स्तरावरून वेतन पथकांनी सदर शाळांकडून यु- डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची सर्व माहिती अद्ययावत केल्याचे मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करून घ्यावे, त्यानंतरच वेतन अदा करण्यासाठी आदेशित करावे. माहिती अद्ययावत न झाल्यास सदर शाळेमधील विद्यार्थी शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभापासून (उदा. मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक सोयी-सुविधा, स्कॉलरशिप इ.) वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माहिती भरतांना तांत्रिक अडचण येत असल्यास तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील टेक्नोसेव्ही शिक्षक, एम.आय.एस. कोऑर्डीनेटर व संगणक प्रोग्रामर यांचेशी संपर्क करण्यात यावा.
सोबतः वरीलपमाणे सहपत्र
(प्रदीषकुमार डांगे, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments