विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत MPSP नवीन आदेश

 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या प्रकल्प संचालकांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.





संदर्भ : १) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मप्राशिप / सशि/संगणक /VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३-११-२३
२) शासन निर्णय क्र, समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांकः १२ मार्च, २०२४.
३) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/आय टी/VSK/आदेश/२०२४-२५/०३१९९ दि.४-७-२४.
४) Director (Digital Education), केंद्रीय शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. १-३४/ २०२२-(DIEGD- part (३) दि.२६-९-२०२४.

उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगदान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. १ ते ३ अन्वये, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १. ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती विद्या समीक्षा केंद्राच्या Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे. तथापि, याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा न घेतल्याने शिक्षक / मुख्याध्यापक यांचेद्वारा याची नियमित अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

तरी आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेद्वारा नियमित आढावा घेऊन आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये १००% विद्यार्थी उपस्थिती नियमित नोंदविली जाईल याची खात्री करावी.

सोबत : संदर्भीय पत्र १ व ३

(आर. विमला, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे द्वारे निर्गमित दिनांक 4 जुलै 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ : १) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र.मप्राशिप / सशि/संगणक / VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३ नोव्हेंबर २०२३

२) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांकः १२ मार्च, २०२४.


उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. १ अन्वये, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आलेली होती. परंतु जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेणे, तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून आली आहे.

संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयानुसार, सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे. तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून आढावा घेण्यात यावा.

सोबत : मार्गदर्शक सूचना।


(राहूल रेखावार भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर Attendance Bot (चॅटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ.१ ली ते इ.१० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती SwiftChat या Application मधील Attendance Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि.०१ डिसेबर २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे, तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून नियमितपणे आढावा घेण्यात यावा. सोबत : मार्गदर्शक सूचना


(प्रदीपकुमार डांगे गा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक म. प्रा. शि. प. मुंबई



विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती - मार्गदर्शक सूचना

१. Google play store वरून SwiftChat है Application download करावे.

२. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार SwiftChat या Application मधील Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.

३. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय.डी. चा वापर करावा.

४. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

५. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय.डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

६. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.

७. काही शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय.डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची स्वतः नोंद करावी.

८. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यु-डायस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

९. या Attendance Bot (वेंटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी, १०. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची यांची दैनंदिन उपस्थिती Attendance Bot (चॅटबॉट) वर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी 

https://tinyurl.com/AttendanceBot

 या लिंकवर सादर कराव्यात.


वरील संपूर्ण आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.