शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना भेट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
१. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या मयत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन, उपदान आणि रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना निवृत्तीवेतन, उपदान लागू केल्यासंबंधी शासन निर्णय असतानाही राज्यातील शेकडो कुटुंबांना त्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. यासंबंधी राज्य सचिव श्री. गोविंद उगले आणि नवनियुक्त राज्य प्रवक्ते श्री जितेंद्र फापाळे यांनी शिक्षण संचालक प्राथमिक, पुणे यांना भेट देऊन चर्चा केली.
संचालक साहेबांनी ह्या विषयाची योग्य दखल घेतली.
प्रथम त्यांनी सांगितले की शासन निर्णय असल्यामुळे अशा कर्मचार्यांना लगेच न्याय दिला जाणे अपेक्षित आहे. तसा न्याय दिला जात नसेल तर त्यासंबंधीचे परिपत्रक आम्ही लवकरात लवकर काढतो.
२. सातव्या वेतन आयोगाचा थकित तिसरा व चौथा हप्ता देण्यासंबंधीच्या दुसर्या विषयावर चर्चा झाली. तिसरा हप्ता २ महिन्यांच्या आत मिळेल. त्यासाठीचे १००० कोटी रु. मान्य झाले आहेत. त्याची कार्यवाही केली जाईल. चौथ्या हप्त्याची मंजुरी शासनाकडून आलेली नाही. त्यामुळे त्याला वेळ लागेल.
नवभारत साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार कायम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सोमवार, दिनांक ६ नोव्हेंबर,२०२३ रोजी नवभारत साक्षरता कार्यक्रमानिमित्ताने शिक्षण संचालक यांनी पुणे येथे सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीस महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राज्य सचिव श्री. गोविंद उगले आणि नवनियुक्त राज्य प्रवक्ते श्री जितेंद्र फापाळे सहभागी झाले होते. सदर बैठकीत सर्व संघटनांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमावर एकसुराने बहिष्कार नोंदविला.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments