12वी उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील 'या' विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपयाचा भत्ता, कोणाला मिळणार लाभ ? कुठं करणार अर्ज ?

 🧑💼 12वी उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील 'या' विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपयाचा भत्ता, कोणाला मिळणार लाभ ? कुठं करणार अर्ज ?


👉 योजनेचे नाव - दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना


दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना दिली जात आहे. ज्याप्रमाणे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ पुरवला जात आहे त्याच धरतीवर या दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ पुरवला जात आहे.


🧾 योजनेचे स्वरूप कसय ?


या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी 51 हजार रुपयांपर्यंतचा भत्ता पुरवला जातो. यामध्ये भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे एकूण 51 हजार रुपये दिले जातात.


⏺️ या योजनेची सुरवात का करण्यात आली ?


बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ज्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय विश्रामगृहात जागा मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.


🤔 योजनेचे उद्दिष्ट काय ?


▪️या योजनेअंतर्गत धनगर समाजातील मुलांना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे.  


▪️शिक्षणादरम्यान धनगर समाजातील मुलांना पैशांची निकड भासू नये हे एक या योजनेचे उद्दिष्ट आहे.


🤗 योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?


▪️या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्याना लाभ दिला जातो. 

▪️ज्या विद्यार्थ्यांना शासकीय विश्रामगृहात प्रवेश मिळालेला नाही अशाच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. 


🤔 योजनेच्या अटी काय ?


▪️सदर विद्यार्थी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.

▪️ विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न २.५० लाख रुपयापेक्षा जास्त असता कामा नये. 

▪️लाभार्थी विद्यार्थी हा 28 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा. 

▪️शिक्षणात खंड पडला असेल अथवा मध्यावधी प्रवेश घेतला असेल असे विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र ठरतील.


 योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे.. 


विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, स्कूल मार्क पत्रके, बोनाफाइड प्रमाणपत्र, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, एनआयसीआर कोडं.

 अर्ज कुठं करणार ?


या योजनेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतो. जे विद्यार्थी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी योजनेच्या अधिकृत स्वयं महाऑनलाइन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे..


https://swayam.mahaonline.gov.in/Registration/Registration


थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) अनुषंगाने शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या/घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४, पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी सर्व प्रकल्प मधुन नविन (अर्ज तपासणी वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियांच्या आधीन राहून केली जाईल) तसेच नुतनीकरणासाठी अर्ज करता येतील.

वसतिगृह, पंडित दीनदयाल स्वयंम योजना संबंधित चौकशी साठी टोल फ्री क्रमांक नंबर 1800 267 0007.

विद्यार्थ्यांसाठी तक्रारी प्रकल्प कार्यालय येथे नोंदविण्यासाठी ई-मेल आणि संपर्क नंबर , मार्गदर्शक सुचना तसेच अधिक माहितीसाठी लिंक वापरा. (Gmail Login अनिवार्य आहे.) 

https://drive.google.com/drive/folders/1XP3C0hm_JIE69IHTy6NEnbzE7SQVahbh?usp=sharing

शैक्षणिक वर्ष २०२३-२४, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (पूर्व माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी,पदव्युत्तर ) अभ्यासक्रमासाठी ३१ जुलै, २०२३, आणि मेडिकल आणि इंजिनीअरींग विध्यार्थ्यांसाठी ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु असेल. खासबाब प्रवेशाबाबतच्या लोकप्रतिनिधी शिफारशी दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंतच आयुक्तालयास प्रकल्प कार्यालय मार्फत सादर कराव्यात .

Upload clear scan copy of original documents. विद्यार्थ्यांनी कागतपत्रांची स्वच्छ प्रत संकेत स्थळा मार्फत सादर(Upload ) करावी.

विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा.

मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत registered असावा. आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थी पडताळणी करणे सोपे होईल.

सायकल ४ आणि ५ साठी शिफारस करण्यासाठी शैक्षणिक वर्षाचे परीक्षा वेळापत्रक महाविद्यालय मार्फत वेळेत प्रकल्प कार्यालयात सादर करावेत.

वसतीगृह प्रवेशासाठी/स्वयम् योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची नोंद (entry) करताना त्यांचा आधार क्रमांक suspend झाला नसल्याची खात्री करून घेणे तसेच आधार क्रमांक suspend झाला असल्यास तो कार्यरत करून मगच त्याची नोंद करणे अनिवार्य आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक नोंद (entry) करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. बँक खाते कार्यरत नसल्यास योजनेंतर्गत लाभ देताना अडचणी येतात. तसेच सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ते आधार संलग्न करून घ्यावे.

ऑनलाईन अर्ज करताना अभ्यासक्रम/शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यास/दिसत नसल्यास याबाबत अशा प्रकरणी संबंधित प्रकल्प कार्यालयात भेट देऊन ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवेश प्रक्रीये संदर्भात अर्ज स्थिती संकेत स्थळावर वेळो वेळी भेट देऊन जाणून घेणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, या बाबत आपणास स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही.

अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती सादर केल्यास, जर अर्ज रद्द झाला किंवा लाभ मिळण्यास विलंब अथवा लाभ रद्द झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.