"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती व राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करणेबाबत शालेय शिक्षण विभागाने दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत
प्रस्तावना:-
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती व राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करणेबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२३/प्र.क्र.११३/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक:- २१ नोव्हेंबर, २०२३.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या अभियानाची रूपरेषा निश्चित करणे व त्यावरील देखरेख व नियंत्रण यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती तर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाची रूपरेषा निश्चित करणे व त्यावरील देखरेख व नियंत्रण यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती तर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती खालीलप्रमाणे गठीत करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
अ) राज्यस्तरीय सुकाणू समिती
२) मा. मंत्री (शालेय शिक्षण), मंत्रालय, मुंबई. अध्यक्ष.
२) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई. सदस्य.
३)राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई.
४) आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सदस्य
५) शिक्षण संचालक, (प्राथमिक), पुणे सदस्य
६) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे सदस्य
७) सहसचिव (विद्यार्थी विकास), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई सदस्य
८) श्री. अमोल शिंदे, खाजगी सचिव, मा. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष कार्यालय, मंत्रालय, मुंबई. सदस्य
९ ) श्री. अमित हुकेरीकर, विशेष कार्य अधिकारी, मा. मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई - सदस्य
१०) खासगी सचिव, मा. मंत्री (शालेय शिक्षण)
११ उपसचिव (शाळा व्यवस्थापन), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई. सदस्य
१२ डॉ. अमोल भोर, विशेष कार्य अधिकारी, मा. मंत्री (शालेय शिक्षण) सदस्य
१३ श्री. प्रसाद मोहाडीकर, सुप्रसिद्ध प्रकल्प व्यवस्थापक सदस्य
१४) श्री. रघुराम जी, रीड इंडिया सदस्य
१५) श्री. तुषार श्रोत्री, माजी संपादक, दैनिक लोकमत सदस्य
१६ कक्ष अधिकारी (एसडी-६), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई सदस्य सचिव.
ब) राज्यस्तरीय कार्यकारी समिती
१) आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - अध्यक्ष.
२ राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई - सदस्य
३) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे -सदस्य
४) शिक्षण संचालक, (प्राथमिक), पुणे सदस्य
५) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे सदस्य
६ सहसंचालक, (प्रशासन), शिक्षण आयुक्तालय, पुणे सदस्य सचिव.
७) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) सदस्य
८ शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व) सदस्य
९ प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) सदस्य
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३११२११७४५०७८७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(इ.मु.काझी)
सहसचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments