महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पुणे आज दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्धिपत्रक द्वारे केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
Online form Link.
https://opsonline.ibps.in/mscepapr23
ज्या शिक्षकांनी यापूर्वी अर्ज केला आहे व ज्यांची सेवा सलग सहा वर्ष पूर्ण आहे अशा शिक्षकांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
ज्या शिक्षकांना पदवी परीक्षेमध्ये पन्नास टक्के पेक्षा कमी गुण होते त्यामुळे या अगोदर अर्ज करता आला नाही असे शिक्षक आता अर्ज करू शकतात.
ज्या शिक्षकांची वय पन्नास वर्षापेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांना अर्ज करता आला नव्हता असे शिक्षक देखील आता अर्ज करू शकतात.
फक्त जिल्हा परिषदेला कार्यरत असलेले संबंधित जिल्हा परिषदेसाठी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 देऊ शकतात.
नगरपरिषद महानगरपालिका किंवा अनुदानित संस्थेवरील शिक्षकांना केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही. असे शिक्षक यासाठी पात्र नाहीत.
जिल्हा परिषदेला कार्यरत जवळपास सर्व शिक्षक ज्यांची पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे व सलग सहा वर्ष सेवा झाली आहे असे सर्व शिक्षक केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 साठी पात्र आहेत.
ज्या शिक्षकांची सेवा सलग सहा वर्षे पूर्ण झाली नाही अशा शिक्षकांनी जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर त्यांचा अर्ज बाद होईल व त्यांनी भरलेले शुल्क त्यांना परत मिळेल.
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ या परीक्षेचे आयोजन माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्याचे नियोजित होते. परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण २०२२/प्र.क्र.८१/टीएनटी-०१, दि. २० जून २०२३ अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मा. न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय संकिर्ण २०२२/प्र.क्र.८१/टीएनटी-०१, दि. २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि. ०१/१२/२०२३ ते दि. ०८/१२/२०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
तसेच मा. न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांचे पडताळणी करुन त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल. तथापि सदर उमेदवारांनी पुनश्चः ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे बंधनकारक राहील.
ठिकाण : पुणे
दिनांक : २९/११/२०२३
(डॉ. नंदकुमार बेडसे)
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४.
वरील संपूर्ण प्रसिद्ध पत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
ऑनलाइन मार्गदर्शन रोज सायंकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत असेल तसेच कोर्स सोबत आपणास pdf नोट्स, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर आणि टेस्ट सिरीज मिळेल...
कोर्स सोबत आपणास मित्र प्रकाशन कोल्हापूर यांचे 250/- किमतीचे 10 प्रश्नपत्रिका संच असणारे पुस्तक मोफत मिळेल.. कोर्स लिंक.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments