जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद च्या शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद शिक्षक व मुख्याध्यापक अध्यापन कार्याव्यतिरिक्त इतर जोड व्यवसाय करतात किंवा कसे याची पथकांमार्फत तपासणी करणे बाबत पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत दिलेल्या सूचना दिनांक 08/11/2023 चा संदर्भ देऊन
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत आपल्या अधिनस्त तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक अध्यापन कार्याव्यतिरिक्त इतर जोड व्यवसाय करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे.
त्यानुषंगाने सोबत दिलेल्या केंद्रनिहाय नियोजनाप्रमाणे केंद्रातील प्रत्येक शाळेवर प्रत्यक्ष भेट देऊन शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांचेशी संपर्क साधून/भेटी घेऊन मुख्याध्यापक/शिक्षक इतर जोड व्यवसाय करत असल्याबाबतची खात्री करावी. सदर तपासणी दिनांक 16/11/2023 ते 24/11/2023 या कालावधीत करण्यात यावी व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा. तसेच सदरील संपुर्ण प्रक्रियेचे संनियंत्रण संबंधित तालुका गटशिक्षणाधिकारी करतील.
सोबतः- केंद्रनिहाय पथक पडताळणी आदेश.
(जयश्री चव्हाण)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments