बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या आधार कार्ड सोबत आपल्याला आपले कोणते व कोणत्या बँकेची खाते संलग्न आहे हे माहीत नसते ते जाणून घेण्यासाठी पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्याने आपल्या स्वतःच्या मोबाईलवरच यूआयडी पोर्टलवर आपण ते पाहू शकतो.
त्यासाठी सर्वात अगोदर पुढील आधारच्या अधिकृत वेबसाइटवर
https://myaadhaar.uidai.gov.in/
भेट द्या. (वरील लिंक वर क्लिक करा)
आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधील निळ्या रंगाच्या लॉगिन बटन वरती क्लिक करा.
लॉगिन बटनावर क्लिक करा.
लॉगिन बटन वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये सर्वात वर आधार क्रमांक अचूक नोंदवायचा आहे त्या खालील कॅपच्या कोड कॅपच्या कोडच्या चौकटी खालील इंटर अबाउ कॅपच्या या ठिकाणी अचूक टाईप करायचा आहे आणि सर्वात शेवटी निळ्या रंगाच्या सेंड ओटीपी बटन वर क्लिक करायचे आहे. तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर सहा अंकी ओटीपी वन टाइम पासवर्ड प्राप्त होईल तो याच विंडो मधील सर्वात शेवटी एंटर ओटीपी या ठिकाणी अचूक सहा अंकी ओटीपी नोंदवायचा आहे ओटीपी नोंदवल्यानंतर त्याखालील लॉगिन बटन ऍक्टिव्ह होईल त्यावर क्लिक करावे.
तुम्हाला नवीन विंडो ओपन होऊन त्यामध्ये तुमच्या आधार क्रमांक अशी संलग्न असलेल्या खात्याच्या बँकेचे नाव व खाते क्रमांकाचे शेवटचे काही अंक दिसतील ज्यावरून तुम्हाला आपले कोणते बँकेचे खाते आधारशी संलग्न आहे हे दिसेल.
जे खाते आपल्या आधारशी संलग्न असेल अशा खात्यावर आपल्या नावावर असलेल्या गॅस कनेक्शनची सबसिडी जमा होत असते.
व इतरही डीबीटी द्वारे जमा होणाऱ्या रकमा याच खात्यात जमा होतात.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
Very useful information
ReplyDeleteThank you🙏
Delete