संच मान्यता सन २०२३-२४ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याबाबत आदेश!

 शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांनी दिनांक दहा डिसेंबर 2024 ला निर्गमित केलेल्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक अमरावती विभाग यांना संच मान्यता सन २०२३-२४ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याबाबत  सुचित केले आहे की अतिरिक्त शिक्षक व  व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही व सदर बाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग यांना दिनांक वीस डिसेंबर 2024 पूर्वी सादर करावा.

आदेश पुढीलप्रमाणे.





सन 2022-23 संचमान्यता या कार्यालयाकडून वाटप करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आपल्या संस्थेत / शाळेमध्ये अतिरिक्त होणा-या शिक्षकाचे प्रथम संस्थाअंतर्गत समायोजन करणेबाबत आपणास यापुर्वीच कळविणेत आलेले होते. संस्था अंतर्गत समायोजन करुण देखील आपलेकडे शिक्षक अतिरिक्त होत असल्यास अशा शिक्षकांची माहिती हे कार्यालय व वेतनपथक अधिक्षक यांचे मार्फत देखील मागविणेत आलेली होती. परंतु माहितीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, काही संस्थानी / शाळानी अतिरिक्त पदाची माहिती अदयाप दिलेली नाही.

सोबतच्या यादीचे अवलोकन करुन अतिरिक्त शिक्षकांची माहिती दिलेली नसेल तर त्यांनी ती सोबतच्या प्रपत्र व मध्ये दि. 17/11/2023 पर्यंत या कार्यालयास संबंधित लिपिक यांचे निदर्शनास आणून कार्यालयीन टपाल शाखेकडे सादर करणेत यावी. तसेच रिक्त जागाची माहिती देखील काही संस्था/शाळा अचुक देत नसलेचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रिक्त पदाची माहिती प्रपत्र अ मध्ये बिंदुनामावलीसह या कार्यालयास सादर करावी.

अतिरिक्त व रिक्त पदाची माहिती या कार्यालयास वेळेत सादर न केलेस व आपल्या शाळेत अतिरिक्त शिक्षक राहिलेस त्यांचे वेतनाची सर्वस्वी जबाबदारी संस्था/शाळा यांची राहिल यांची नोंद घ्यावी. तसेच सदर शाळेने शिक्षक पद रिक्त असताना देखील रिक्त पदाची माहिती न कळविलेस अश्या संस्था / शाळा यांना रिक्त पद पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीस परवानगी मिळणार नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे चुकीची अथवा अपुर्ण माहिती देणेत येऊ नये.

सोबत या प्राप्त झालेल्या रिक्त पदाची व अतिरिक्त शिक्षकाची माहिती देणेत येत आहे त्यावर कोणाची हरकत असेल तर त्या हरकती देखील दि. 20/11/2023 रोजी अधिक्षक (रा.प) यांचे निदर्शनास आणून सबळ कागदपत्रासह लेखी टपाल शाखेकडे जमा करणेत यावी. त्यानंतर येणा-या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत यानंतर अंतिम अतिरिक्त शिक्षकाची व रिक्त पदाची यादी घोषीत करणेत येईल व त्यानुसार समायोजन प्रक्रिया घेणेत येईल याची नोंद घेणेत यावी.


मा.शि.अ. यांच्या मान्यतेने

 (रमेश चव्हाण)

उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

पुणे जिल्हा परिषद, पुणे



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. सर्व मुख्याध्यापक सेटिंग करून मोकळे होतात

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.